वर्धा,०८/०२/२०२१- घरात प्रवेश करून चोरी करणारा चोरटा हिंघणघाट पोलीसांच्या जाळ्यात सापडला. फिर्यादी मनिष बळीरामजी निलेकर,रा. शिवाजी वार्ड , हिंगणघाट यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दिली की ,फिर्यादी हे दिनांक ०५-०२ २०२१ ते दिनांक ०६-०२-२०२१ या दरम्यान घराचे दाराला कडी लावुन भावाचे हळदीचे कार्यक्रमात गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराची कडी उघडुन घराचे आत प्रवेश करुन घरात ठेवलेली गॅसशेगडी व सिलेंडर असा एकुण ४,५०० / - रु . चा माल चोरुन नेला . अश्या फिर्यादीच्या रिपोर्टवरून पो.स्टे . हिंगणघाट येथे अप.क्र . १२५/२०२१ कलम ४५४ , ४५७ , ३८० भादंविचा गुन्हा नोंद करण्यात आला


सदर गुन्ह्याची तात्काळ दाखल घेवून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाने परीसरात अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी संजय मंगलसिंग वैद्य,वय ४१ वर्षे रा.हिंगणघाट यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे .
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर,अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके , उपविभागीय पोलीस अधिकारी ,हिंगणघाट दिनेश कदम यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार विवेक बनसोड,सुहास चांदोरे,पंकज घोडे,प्रशांत वाटखेडे यांनी केली .

घरात प्रवेश करून चोरी करणारा चोरटा हिंघणघाट पोलीसांच्या जाळ्यात thief who broke into house was caught by Hinghanghat police
 
Top