विकेल ते पिकेल योजना भरीव तरतूद


    शेळवे,(संभाजी वाघुले),०३/०२/२०२१- विकेल ते पिकेल योजनेसाठी जिल्हा विकास निधीतील नाविन्यपूर्ण योजनेमधून निधीची तरतूद करु, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर येथे सांगितले.


   सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे टोल नाक्यावर बापू लोंढे यांच्या विकेल ते पिकेल योजनेतील स्टॉलचे उदघाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी दुरंगे आदी उपस्थित होते.

   मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कल्पनेतून विकेल ते पिकेल योजना सुरू करण्यात आली आहे. संत सावता माळी रयत बाजार योजनेतून विकेल ते पिकेल योजना सुरु करण्यात आली आहे.शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री साखळी विकसित करण्यासाठी ही योजना आहे.या योजनेतून जिल्ह्यातील सुमारे ११०० शेतकऱ्यांना विविध पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. या शेतकऱ्यांना शासकीय कार्यालये, महामार्गालगत, हौसिंग सोसायटीच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

      वरवडे येथील श्री. लोंढे यांच्या स्टॉलला श्री. शंभरकर यांनी भेट दिली.त्यांच्याकडून पेरू,पपई, हरभरा डहाळे विकत घेतले.त्यांनी या शेतकऱ्यां च्या उत्पादन आणि विक्रीबाबत माहिती घेतली.

विकेल ते पिकेल योजनेसाठी भरीव तरतूद- जिल्हाधिकारी शंभरकर Substantial provision for Vikel to Pickel scheme - Collector Shambharkar
 
Top