शिवसेना महिला आघाडीच्यावतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

       पंढरपूर,प्रतिनिधी,०४/०२/२०२१ -पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज पंढरपूर शहरामध्ये शिवसेना महिला आघाडीच्यावतीने येथील महिला आघाडी संर्पक कार्यालयात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. 

     या महिला आघाडी सदस्य नोंदणी अभियाना अंतर्गत जास्तीत जास्त महिलाचा सहभाग नोंदवून महिला आघाडी संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.जास्तीत जास्त महिला सद्स्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.तसेच संघटनेच्या माध्यामातून महिलांचे प्रश्न सोडविण्या साठी महिला आघाडी प्रयन्त असणार आहे.

     यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे,पंढरपूर महिला आघाडी तालुका प्रमुख आरती बसंवती,महिला आघाडी शहरप्रमुख पूर्वा पांढरे,विधानसभा संघटक संगीता पवार,शहर सन्मवयक रेहना शेख,सुप्रिया कदम,उपतालुका प्रमुख लक्ष्मी ढोणे,उपशहर प्रमुख रेहना आतार, शरीफा पठाण,अनिता पटाईत,मंजुषा धोडमिसे, महिला आघाडी विभागप्रमुख,गटप्रमुख, शाखा प्रमुख आदी उपस्थित होत्या.

शिवसेना महिला आघाडीच्यावतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात -शैला गोडसे shivsena mahila aghadi launches member registration drive -shaila godase 
 
Top