शेतीसाठी गुणवत्तापूर्ण औषधांची गरज - धीरज कदम need for quality medicine for agriculture - dhiraj Kadam
        रोपळे,ता.पंढरपूर - आपल्या शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी योग्य नियोजनबरोबरच गुणवत्ता पूर्ण औषधांची गरज असून या औषधांमुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येते,असे प्रतिपादन रेडियन्स क्रोपकल्चर इंडस्ट्रीजचे डायरेक्ट धीरज कदम यांनी केले. 

       रेडियन्स क्रोपकल्चर इंडस्ट्रीजने आपल्या उत्पादित औषधांसाठी आयोजित केलेल्या वाढीव विक्री योजनेच्या शुभारंभप्रसंगी डायरेक्टर धीरज कदम बोलत होते. या वाढीव विक्री योजनेचा शुभारंभ रावसाहेब कदम व अविनाश कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ.गणेश गोडसे, धन्यकुमार केदार,युवराज मुळे,विवेक भोसले, डॉ. उत्तम कदम,दादासाहेब गायकवाड,दीपक माने,  डॉ.सचिन व्यवहारे,श्रीकांत भोसले,शिवदास शितोळे,अमोल पाटील,कपिल मुळे आदी उपस्थित होते.

      पुढे बोलताना कदम यांनी रेडियन्स औषधांची माहिती देऊन वाढीव विक्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित वाघमारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज कदम,रमेश साळवी,धीरज पवार,प्रवीण पवार,श्रीराम कुलकर्णी,अक्षय कदम,अक्षय भोसले,विकास आदमीले यांनी परिश्रम घेतले.
 
Top