पालघर -दिनांक ०७/०२/२०२१ -सुरजकुमार मिथिलेश दुबे यांच्या हत्येबाबत घोलवड पोलीस स्टेशन येथे बेवजी गाय ते बैजलपाडा या रस्त्यावरती दिनांक ०५/०२/२०२१ रोजी दुपारी ४.४५ वा.एका युवकाला जळण्याच्या जखमा सहीत लोकांनी पाहिले . त्या लोकांनी घोलवड पोलीस स्टेशनला कळविले . त्यानुसार घोलवड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सदर ठिकाणी पोहचले . त्या युवकाला उपचाराकरीता कॉटेज हॉस्पीटल,डहाणु येथे दाखल केले . अधिक उपचाराकरीता आय.एन.एस.अश्विनी हॉस्पीटल मुंबई येथे दाखल करण्यात आले . उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यु झालेला आहे . मयत व्यक्तीचे नाव सुरजकुमार मिथिलेश दुबे ,वय २७ वर्षे असे असुन ते रा.कोलहु गाच , पोलीस स्टेशन चैनपूर , जिल्हा - पालापु , राज्य झारखंड येथील रहिवाशी आहे . सुरजकुमार हे इंडीयन नेव्हीमध्ये लिडींग सी मॅन या पदावर काम करीत होते.त्यांची आय.एन. एस.अग्रीनी कोईमतुर तामिळनाडु येथे पोस्टींग होती .

सुरजकुमार यांच्या जबाबावरुन दि ०१/०१/ २०२१ ते दिनांक ०१/०२/२०२१ पर्यंत ते रजेवर होते .दिनांक ३०/०१/२०२१ रोजी सुट्टी संपवुन ते रांची येथुन सकाळी ०८.०० वाजता विमानाने रात्री २१.०० वा.चेन्नई विमानतळावर पोहचले.विमान तळाच्या बाहेर आल्यावर ३ अज्ञात इसमांनी सुरजकुमार यांना रिवॉल्व्हरचा धाक दाखविला व त्यांचेकडील ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरीने चोरुन घेतला.त्यांना सफेद रंगाच्या एस.यु. व्ही.गाडीमध्ये टाकून त्यांचे अपहरण केले व त्यांना ३ दिवस चेन्नई येथे कोंडुन ठेवले.दि ०४/०२/२०२१ रोजी सायंकाळी चैन्नई येथे एका गाडीत बसविण्यात आले . त्यानंतर पुढील घटनाक्रम त्यांना समजत नाहीत . दिनांक ०५/०२/२०२१ रोजी सकाळी घोलवड जवळील वेवजी गावाच्या बैजलपाडा जंगलात नेले व त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतुन जाळुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद दिल्याने घोलवड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं .०६ / २०२१ कलम ३०७,३६४ ( अ ) , ३ ९ २,३४२,३४ भारतीय हत्यार अधिनियम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

दरम्यान जखमी सुरजकुमार यांचा मृत्यु झाल्याने भा.द.वि.स.कलम ३०२ हे कलम सदर गुन्हयात वाढविण्यात आलेले आहे . गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेऊन गुन्हयाचा तपास धनाजी नलावडे , उप विभागीय पोलीस अधिकारी,डहाणु विभाग , डहाणु यांचेकडे देण्यात आलेला आहे.सदर तपासा दरम्यान पुढील बाबी निर्दशनास आलेल्या आहेत . १. दिनांक ३१/०१/२०२१ रोजी सुरजकुमार यांच्या वडीलांनी सुरजकुमार याचा फोन बंद लागल्याने त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन चहलपुर,जिल्हा झारखंड येथे हरविलेबाबत तक्रार दिलेली आहे . तसेच त्यांनी आय.एन.एस.अग्रीनी कोईमतुर येथील कमांडट ऑफीसर अशोक रॉय यांना सुध्दा माहिती दिली.त्यावरुन इंडियन नेव्हीच्या नक्षल पोलीसांनी देखील तपास सुरु केला .
२.नेव्ही व झारखड पोलीसाकडुन तपास सुरु असताना असे लक्षात आले सुरजकुमार (मृतक) याचे कुटुंबाला सुरजकुमार यांचेकडे दोन मोबाईल नंबर असल्याचे माहीत होते . तपासादरम्यान सुरजकुमार यांचेकडे आणखी तिसरा मोबाईल नंबर असून त्यावर दि ०१/०२/२०२१ सुरजकुमार याचा चुलत भाऊ श्री.चंदनकुमार यांनी फोन केला होता व तो दि ०१/०२/२०२१ रोजी संध्याकाळी ०६.०० वा.पर्यंत चालु असल्याचे निष्पन्न झालेले आहे . त्यानंतर तो फोन देखील बंद करण्यात आलेला आहे.तसेच त्या मोबाईलवरुन सुरजकुमार यांनी अस्था कंपनी,भोपाल, मुंबई आणि अंजल कंपनी मुंबई या शेअर मार्केट कंपनीमध्ये सतत दोन दिवस मोठया प्रमाणात व्यवहार केलेला आहे.
  ३.सुरजकुमार याचे बँक खात्याची माहीती घेतली असता त्यांचे पगार खाते है स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा कुलाबा , मुंबई येथील असुन या खात्यामध्ये आतापर्यंत ८,४३,००० / - रुपायाचे वैयक्तीक कर्ज घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे . या खात्यामधून सातत्याने शेअर ट्रेडिंग झालेले असून शेवटी फक्त ३०२ रुपये शिल्लक आहेत.या पगार खात्या व्यतिरिक्त स्टेट बैंक ऑफ इंडिया आय.एन.एस. नेव्ही मुंबई येथे दुसरे बैंक खाते असल्याचे निष्पन्न झालेले आहे . या खात्यामध्ये पाच हजारापेक्षा जास्त रक्कम होती . सदर खात्यामधुन दिनांक ०१/०२/२०२१ रोजी चेन्नई येथील एका एटीएम मधून पाच हजार रुपये काढल्याचे निष्पन्न झाले आहे व या खात्यामध्ये अखेर फक्त ९० रुपये शिल्लक आहेत.दोन्ही खात्यावर मोठया प्रमाणात कर्ज असल्याचे दिसुन येत आहे . 
    ४. सुरजकुमार यांनी आय.एन.एस,नेव्ही येथील त्याचे सहकारी याचेकडुन सहा लाखापर्यंत हेन्ड लोन घेतले आहे .त्याचे सहकारी घेतलेल्या हॅन्ड लोनची सुरजकुमार याचेकडे मागणी करीत होते परंतु अदयाप पावेतो त्यानी दिलेली नसल्याचे निष्पन्न झालेले आहे . 
   ५.दिनांक १५/०१/२०२१ रोजी मार यांचा सार रपुडा झाला असुन सासरकडील लोकांनी एकुण नऊ लाख रुपये क खात्यामध्ये व इतर स्वरुपात दिलेले आहेत . सदर तपासाचे गांर्भीय लक्षात घेऊन दत्तात्रय शिंदे पोलीस अधीक्षक ,पालघर यांच्या आदेशान्वये प्रकाश गायकवाड,अपर पोलीस अधीक्षक ,पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण १० पथके तयार केलेली आहेत.प्रत्येक पथकामध्ये १ अधिकारी व १० अंमलदार याचा समावेश केलेला आहे .सदरची पथके महाराष्ट्रात व भारतातील इतर राज्यात तपासकामी रवाना करुन सखोल तपास करीत आहेत .

सुरजकुमार दुबे यांच्या हत्येबाबत गूढ Mystery about murder of SurajKumar Dubey
 
Top