पंढरपूर - मेगा covishield लसीकरण मोहीम १२ फेब्रुवारी शुक्रवार फक्त पोर्टलवर नोंदणी असलेल्या सरकारी व खाजगी आरोग्य कर्मचारी तसेच महसूल,पोलिस, नगरपालिका, ग्रामपंचायत पंचायत समिती फ्रंट लाईन कर्मचारी यांचे करिता पंढरपूर तालुक्यामध्ये दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी covid-19 लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

    सदर लसीकरण मोहीम ही खालील संस्थेमध्ये राबविण्यात येणार आहे -

१) उपजिल्हा रुग्णालय, संसर्गजन्य रुग्णालय - पंढरपूर (नगरपालिका कर्मचारी)
२) ग्रामीण रुग्णालय करकंब- (karkamb पोलिस कर्मचारी व त्या भागातील आरोग्य सरकारी खाजगी तसेच इतर विभागातील त्या भागातील फ्रंट लाईन कर्मचारी)
 ३) गलॅक्सी हॉस्पिटल पंढरपूर-(महसूल व पंचायत समिती कर्मचारी)
४) प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव-(शासकीय आरोग्य कर्मचारी)
५) प्राथमिक आरोग्य केंद्र,गादेगाव-(होम गार्ड कर्मचारी तसेच त्या जवळच्या भागातील आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाईन कर्मचारी)
६)अँपेक्स हॉस्पिटल,पंढरपूर-(पंढरपूर शहर व ग्रामीण तसेच मंदिर पोलिस कर्मचारी)
७)विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर(खाजगी डॉक्टर्स व क्लिनिक हॉस्पिटल स्टाफ)

   आतापर्यंत covid-19 लसीकरणापासून वंचित राहिलेले सर्व शासकीय कर्मचारी,आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस तसेच खाजगी रुग्णालयातील नोंदणीकृत डॉक्टर,इतर कर्मचारी.

    पोलीस विभागातील सर्व कर्मचारी,महसूल विभागातील सर्व कर्मचारी,ग्रामपंचायत विभागा तील सर्व कर्मचारी,पंचायत समिती पंढरपूरमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी,पंढरपूर नगर पालिका अंतर्गत सर्व कर्मचारी यांनी covid-19 लसीकरण करून घ्याावे.प्राधान्याने वरील नमूद केलेले कर्मचारी यांनी आपण नेमून दिलेल्या लसीकरण केंद्र ठिकाणी लसीकरण करावे परंतु काही अडचण असेल तर आपण यापैकी कोणत्याही ठिकाणी लसीकरण घेऊ शकता.परंतु सोबत दिलेल्या यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे.वरील नमूद ज्या आरोग्य कर्मचारी किंवा फ्रंट लाईन वर्कर यांची नावे यादीमध्ये दिसून येत नाहीत त्यांनी उद्या वॉर रूमला नोंदणी करावी पूर्वी नोंदी दिल्या आहेत परंतु यादीत नाव दिसत नाही अश्यानी सुधा वॉर रूम प्रांत ऑफिस या ठिकाणी नोंदणी करावी.नोंदणी करिता सोबत दिलेल्या कर्मचारी यांना संपर्क करावा.पोर्टल ला नोंदी ज्याच्य आहेत त्यांनाच लसीकरण दिले जाईल इतरांना पोर्टलवर नोंदणी झालेनंतर लसीकरण केले जाईल .पोर्टल वर नाव दिसत नसेल तर लसीकरण करता येणार नाही .नोंदणी रीतसर करून घ्यावी नंतर लसीकरण मिळेल.

  सदर लसीकरणासाठी येताना आपल्या विभागाचे शासकीय ओळखपत्र घेऊन येणे. शासकीय ओळखपत्रा सोबत खालील एक आयडी प्रूफ घेऊन येणे.. (आधार कार्ड आणू नये)

१) पॅन कार्ड
२) ड्रायव्हिंग लायसन
३) बँक पुस्तकाची झेरॉक्स
४) मतदान ओळखपत्र

    सदर मोहीम दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे. आता पर्यंत १६०० लसीकरण पंढरपूर तालुक्यातून झाले आहे तरी न घाबरता लसीकरण करून घ्यावे परंतु अँलर्जी,रक्त पातळ होण्याच्या गोळ्या चालू असतील, नजीकच्या काळात covid positive असले तर,गरोदर व स्तनदा माता तसेच इतर आपली माहिती लसीकरण वेळेस द्यावी जेणेकरून आपल्याला लस देण्याबाबत योग्य निर्णय तेथील वैद्यकीय अधिकारी यांना घेता येईल असे सचिन ढोले उपविभागीय अधिकारी पंढरपूर,अध्यक्ष लसीकरण समिती,डॉ एकनाथ बोधले समन्वयक तथा तालुका आरोग्य अधिकारी -पंढरपूर, सदस्य, सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी,वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर व करकंब ,वैद्यकीय अधिकारी नागरी व ग्रामीण अध्यक्ष आयएमए, होमिओपॅथी,फार्मसी, निमा यांनी कळवले आहे. 
 
Top