पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे अ.म. नोंद क्र . 06/2021 सी.आर.पी.सी कलम 174 प्रमाणे दिनांक 12/02/2021 रोजी दाखल असून सदर दाखल मयत हे धोंडेवाडी पाटीजवळ शेगांव मायनर जैनवाडी शिवारामध्ये पोपट कृष्णा एखतपुरे यांचे शेतातून जाणाऱ्या पाण्याच्या कॅनॉल नळामध्ये एक पुरुष जातीचे प्रेत मिळून आले असून ते उताण्या अवस्थेत अंगात सर्ट बनीयन नसून निळ्या रंगाची जीन फुल पॅन्टवर इंग्रजीमध्ये " HIDDENT MAKE IN INDIA 36 इंच 90 सेंमी असे लिहलेले असून कंबरेच्या बेल्टच्या बक्कलवर HY618 असून कंबरेचा रेक्झीन बेल्ट आहे . निळ्या रंगाचे लक्स कोजी कंपनीची अंडरवेअर असून उजवे हाताच्या मनगटात काळे रंगाचा कारले नक्षीचा गोप आहे . तसेच सदर मयताचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून त्याचे कंबरेला तसेच दोन्ही पायाला काळया रंगाच्या सुताच्या दुपदरी दोरीने बांधलेले असून दोन्ही पाय सरळ आहेत.सदरचे प्रेत फुगलेले असुन दुर्गंधी येत आहे.     तरी वरील वर्णनाचे अज्ञात अनोळखी मयताचे नातेवाईक मिळून आलेस पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे फोन नं . 02186-220122 व मो .नं.7870807551,9834254238 यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांनी केले आहे.याचा तपास एस.पी.गोदे,पोलीस उपनिरीक्षक ,पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत आहेत. 

 जैनवाडी शिवारामध्ये कॅनॉलमध्ये एक पुरुष जातीचे प्रेत male corpse in a canal in Jainwadi Shivara
 
Top