रस्ता दुरूस्तीसाठी वकिलाने रक्ताने लिहुन पाठवले मुख्यमंत्र्यांना पत्र..
lawyer sent a letter to Chief Minister in blood for road repairs


   पंढरपूर - पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूर रोड गेली अनेक वर्षे झाले प्रलंबित आहे. विस्तारीकरण होणार म्हणुन तो रस्ता दुरूस्तीस सार्वजनिक बांधकाम विभाग टाळाटाळ करत आहे.त्यात सोलापुर व इतर भागातून पंढरपुकडे येणारी अवजड वाहतुक आणि वाळू वाहतूक याच मार्गाने होते त्यामुळे अक्षरश रस्त्याची चाळण झाली आहे. इथे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच समजत नाही.त्यामुळेच या रस्त्यावरून दररोज ये जा करणारे देखील या समस्येने पुरते वैतागून गेले आहेत.अक्षरशः जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही त्याचे डांबरीकरण होत नाही म्हणून पंढरपुर तालुक्या तील सुस्ते येथील अँड.विजयकुमार नागटिळक यांनी थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहीले आहे.

    यामध्ये त्यांनी रस्ता हा तात्काळ दुरूस्त करावा व दररोज प्रवास करणार्या प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी केली आहे. एका वकिलाने पत्र तेही रक्ताने लिहुन ही मागणी केल्याने आता हा रस्त्याचा प्रश्न किती बिकट आहे हे यावरून समजते.आता सरकारने देखील याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले पाहिजे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. 
 
Top