सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावरील किर्तन सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता 
kirtan ceremony at Sahakar Shiromani Karkhana workplace concludes with kirtan of Kala

     चंद्रभागानगर,दि.०९/०२/२०२१ - सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे यांच्या १९ व्या पुण्यतिथी निमित्त सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखाना, धोंडेवाडी,ता.पंढरपूर कार्यस्थळावर कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या किर्तन सोहळयाची सांगता मळोली ता.माळशिरस येथील गुरुवर्य ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या किर्तनाने झाली.यावेळी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे उपस्थित होते. प्रारंभी संस्थापक चेअरमन स्व.वसंतराव (दादा) काळे यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे पुजन करण्यात आले.

      काल्याच्या किर्तनामध्ये " एकमेका देऊ मुखी,सुखी घालु हुंबरी .." जगतगुरु तुकोबारायांच्या या अभंगाचे निरुपण करताना ह.भ.प.बापूसाहेब महाराज देहूकर यांनी गोकूळातील श्रीकृष्ण लिलांचे वर्णन करताना सहकाराची कल्पना श्रीकृष्णाने तेव्हा रुजविल्याचे सांगत प्रतिकूल परिस्थितीत संस्थापक वसंतराव काळे यांनी भाळवणीच्या माळरानावर सहकार मंदिर उभारुन शेतकरी व कामगारांचा उध्दार केल्याचे सांगीतले. चेअरमन कल्याणराव काळे यांनी त्यांच्या आचार-विचारांचा वारसा सक्षमपणे चालवित असल्याचेही त्यांनी नमुद केले.  

    सहकार शिरोमणी कारखान्याचे संस्थापक स्व.वसंतराव (दादा) काळे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर दरवर्षी धार्मिक व सामाजिक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर उर्वरीत कार्यक्रमांना फाटा देत सामाजिक अंतराचे भान ठेवुन २ ते ९ फेब्रुवारीपर्यंत केवळ किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

   सदर किर्तन सोहळ्यामध्ये प्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कावडे, ह.भ.प.शक्ती महाराज चव्हाण, बालकिर्तनकार ह.भ.प.भक्ती महाराज देठे, ह.भ.प.निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प.प्रदिप महाराज ढेरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पवार, ह.भ.प.एकनाथ महाराज चौगुले यांनी या किर्तन सोहळ्यात किर्तन सेवा देवून उपस्थित भाविक भक्तांना आपल्या सुमधुर वाणीने मंत्रमुग्ध केले. काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. किर्तन सोहळ्याचे व्यवस्थापक म्हणून कारखान्याचे मा.संचालक शहाजी पासले, संचालक भारत कोळेकर व ह.भ.प.धनंजय महाराज गुरव यांनी काम पाहिले.  

    याप्रसंगी मा.व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालिका मालनबाई काळे,सौ.संगिताताई काळे, संचालक सर्वश्री मोहन नागटिळक,बाळासाहेब कौलगे,भारत कोळेकर,राजाराम पाटील,अँड. तानाजी सरदार,विलास जगदाळे,सुधाकर कवडे, योगेश ताड,युवराज दगडे,इब्राहिम मुजावर,अरुण बागल, नागेश फाटे,राजसिंग माने,संभाजी बागल, तानाजी जाधव, तुकाराम माने,कार्यकारी संचालक प्रदिप रणनवरे, बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब काळे,उपाध्यक्ष डी.डी. काळे, सभासद शेतकरी, विविध विभागातील खातेप्रमुख व कर्मचारी, परिसरातील भाविक उपस्थित होते.
 
Top