याबाबत माहिती अशी आहे कुर्डूवाडी येथील एमआय डीसीमध्ये मंगळवार दुपारी १ :३० च्या दरम्यान आग लागली. यानंतर सदर माहिती जीनिंग मिलचे कर्मचारी नागनाथ गात यांनी स्वतः नगरपरिषदेत येऊन दु २ वाजून १६ मिनिटांनी नगर परिषदेचे तुकाराम पायगण यांना दिली.त्यामुळे तुकाराम पायगण हे अग्नीशामक दलासह घटनास्थळी दाखल झाले. सिद्धेश गोफणे, सुजित बागल,बंडू जाधव यांनी तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सदर आग नियंत्रणात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
जिनिंग मिलचे मोठे नुकसान झाले असून मालक संजय मालू यांचे पुत्र सुरज मालू ,सांगली हे घटना स्थळी दाखल झाले होते.त्यांनी याबाबत बोलताना वाचवलेला काही माल काढण्याचे काम चालू असून त्यानंतर फिर्याद देणार असल्याची माहिती दिली.सदर आग शाँक सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कुर्डूवाडीत जिंनिग मिलला आग,लाखो रुपयांचे नुकसान jinning mill fire in Kurduwadi,loss of millions of rupees