वर्धा -पो.स्टे.वर्धा शहर अप.क्र .११३२/२०२० भा.दं.वि. सहकलम ४३ (अ),६६(सि)(डी) माहीती तंत्रज्ञान कायदा २००८ या गुन्ह्यामध्ये राजस्थान येथून आरोपी अटक करून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीकरीता पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा दि ११/०२/२०२१  रोजी प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. 

      पोलीस स्टेशन वर्धा शहर अपराध क्रमांक ११३२/२०२० भा.दं.वि. सहकलम ४३ ( अ ) , ६६ ( सि ) ( डी ) माहीती तंत्रज्ञान कायदा २००८ या गुन्हयामधील आरोपीतांनी आर्मीमध्ये असल्याचे सांगुन ओ.एल.एक्स.या ऑनलाईन खरेदी - विक्री साईटचा वापर करुन फिर्यादी यांची एकुण २,५१,७३० / - रु फसवणुक केली .अशा महाराष्ट्रातील बहुचर्चित गुन्हयामध्ये तांत्रीक तपास करुन आरोपी निष्पन्न करुन खालील नमूद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुन्हयातील आरोपींना थुन,जिल्हा भरतपुर,राजस्थान येथून अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे . सदर अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्यपरायणता व चिकाटी नक्कीच स्तुत्य आहे.त्यांनी केलेली कामगिरी ही वर्धा जिल्हा पोलीस विभागाकरीता अतिशय अभिमानास्पद बाब आहे . 

      याबद्दल गोपाल ढोले,पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा, निरंजन वरभे,पोलीस हेड कॉन्स्टेबल, स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा, हमिद शेख,पोलीस हेड कॉन्स्टेबल ,स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा ,रंजित काकडे,पोलीस हेड कॉन्स्टेबल, स्थानिक गुन्हे शाखा,दिनेश बोथकर,नाईक पोलीस कॉन्स्टेबल , सायबर शाखा,अनुप कावळे,नाईक पोलीस कॉन्स्टेबल, सायबर शाखा वर्धा यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.


  उत्कृष्ट कामगिरीकरीता पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. honesty perseverance of these officers and employees is certainly admirable
 
Top