मुळशी तालुक्यासाठी रूग्णवाहिका घेण्यासाठी रु ११ लाख देणार - डॉ नीलम गोऱ्हे


       पुणे- मावळ तालुक्यातील माले गावात तहसीलदार कार्यालय मावळ व जिल्हाधिकारी पुणे यांचेवतीने महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी योजनेमध्ये मावळ तालुक्यात शासनाच्या विविध विभागाचे १५ प्रकारचे दाखले वाटप कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे उदघाटन करताना प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ नीलम ताई गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी अभय चव्हाण तहसीलदार,संदेश शिर्के प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी पुणे तसेच युवसेना जिल्हाप्रमुख अविनाश बलकवडे,शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, स्वाती ढमाले व तालुक्यातील नागरिक हजर होते. 

     कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात जाऊन आवश्यक असणारे दाखले मिळविणे शक्य झाले नाही त्यामुळे या अभियानाला खूप महत्व आहे. सामान्यांना एकाच छताखाली हे दाखले तात्काळ मिळण्याची सोय झाली आहे व दाखलेही तात्काळ मिळत आहेत. यासाठी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संग्राम थोपटे आणि जिल्हाधिकारी पुणे यांचे मोलाचे सहकार्य राहीले. त्यांच्या प्रयत्नातून संयोजक अविनाश बलकवडे,स्वाती ढमाले,रमेश कोंडे यांनी हे शिबिर घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. 

       या शिबिरात महसूल,एसटी महामंडळ,वीज महामंडळ, पॅन कार्ड,पुरवठा विभागाचे रेशन कार्ड ची कामे करण्यात येत आहेत.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराने काम करताना ८० % समाजकारण हेच लक्ष समोर ठेवण्यात आले आहे,असेही डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 
              
    गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम आहे.यामध्ये शासन स्तरावरून मदत करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल असे ही त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले. तसेच आजदेखील सेनापती बापट यांनी सुरू केलेल्या संघर्षाची आठवण नक्कीच आहे.त्यांच्या विचाराप्रमाणे महाराष्ट्र हा भारताचा आधार आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे असे नीलमताई गोर्हे  म्हणाल्या

       मुळशी तालुक्यासाठी संयोजकांचे विनंती नुसार रु ११ लाख डॉ गोऱ्हे यांचे स्थानिक विकास निधीतून अपंगांच्या शाळेसाठी किंवा रूग्णवाहिके साठी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

      तहसीलदार,प्रांत अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या या प्रयत्नाचा व बलकवडे,स्वाती ढमाले व रमेश कोंडे यांचे संयोजनाबाबत डॉ गोऱ्हे यांनी शासनाचेवतीने अभिनंदनही केले.

शासनाचे महाराज्यस्व अभियान सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त government's Maharajyaswa Abhiyan is very useful for common man
 
Top