आम्हाला कोरोना लस कधी ? पत्रकारांसह आरोग्य कर्मचारी 

कुर्डुवाडी/राहुल धोका,०५/०२/२०२१ - कुर्डुवाडी शहरात ग्रामीण रुग्णालयात कोरोणा लसीकरण केले जात आहे.यात अनेक आरोग्य कर्मचारी व पत्रकार वंचित राहिले आहेत .
कोरोना लाँकडाऊन तसेच जनजागृती मोहिमेत पत्रकारांचेही योगदान मोठे राहिले आहे सध्या कोरोना वॅक्सीनबाबत शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्यांनी लस देण्याचा क्रम ठरविला आहे. 'आम्हाला लस कधी' अशी पत्रकारांची संभ्रमावस्था झाली आहे तरी पत्रकारांचाही प्राधान्य क्रमाने विचार व्हावा असे वाटते. 
-श्रीनिवास बागडे ,वरिष्ठ पत्रकार
     आरोग्य, पोलिस ,शासकिय कर्मचारी,आशा वर्कर आदी माढा तालुक्यातील १९०० लोकानी रजिस्ट्रेशन केले होते,त्यांचे लसीकरण होणार आहे मात्र यात १० टक्के पेक्षा जास्त आरोग्य कर्मचारी,अधिकारी,शासकिय कर्मचारी यांचे रजिस्ट्रेशन केले असून त्यांची नावेच पोर्टलवर आली नाहीत तर काही जण कोरोना काळात लाँकडाऊनमुळे लसीकरण रजिस्ट्रेशन करु शकले नाहीत.सध्या वैद्यकीयसेवेसाठी कोविन अँप लॉक झाले आहे,मात्र पोलिस,प्रांत आँफिस कर्मचाऱ्यांचे रजिस्ट्रेशन चालू आहे.पत्रकरांसाठी शासनाचे धोरण अद्याप निश्चितच झालेले नाही.त्यामुळे पत्रकारी क्षेत्र यातून वंचितच राहाणार आहे .

        याबाबत तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.शिवाजी थोरात यांच्याशी संपर्क केला असता यापूर्वी सर्व रुग्णालयांना कळवले होते,आता लगेच मेडीकल स्टाफचे रजिस्ट्रेशन होणार नाही.सध्या फ्रंट लाईनचे लसीकरण चालु असून राहिलेल्या मेडीकल स्टाफचेही यानंतर रजिस्ट्रेशन करून घेतले जाईल असे त्यांनी प्रतिनिधी बोलताना सांगितले.

      पत्रकारांबाबत जिल्हाआरोग्य अधिकारी यांना कळवत आहोत असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

कुर्डुवाडीत कोरोना लसीकरण,पत्रकारांसह अनेक आरोग्य कर्मचारी वंचित 
corona vaccination in Kurduwadi, depriving many health workers including journalists
 
Top