मैत्रीच्या जिव्हाळ्यातुन साकारले कोरोना संरक्षण


   पंढरपूर,प्रतिनिधी- मैत्री म्हटलं कि प्रेम,जिव्हाळा, शाळेतील आठवणी अन शाळेविषयीची आपुलकी हे सारच मनामध्ये दाटून येतं.पण हीच मैत्रीची मैफिल जेव्हा एकत्र येते तेव्हा मैत्री अन शाळा या ऋणानुबंधातुन समाजासाठी आदर्शवत कार्य सुद्धा साकारते. याचाच प्रत्यय रोपळे विद्यालयाच्या १९९४-९५ बॅचच्या दहावीच्या विद्यार्थानी मैत्रीच्या जिव्हाळ्यातुन कोरोनाचे संरक्षण उभारून दिला आहे.

    पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील श्री.शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातील १९९४- ९५ मधील इयत्ता दहावीतील बॅचच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपूर्वी आठवणीतील सुवर्णक्षण या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेह मेळाव्यास दोन वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने शिक्षकांचा सन्मान व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आपण ज्या शाळेमध्ये मध्ये घडलो ती शाळा कोरोनामूक्त रहावी. या उद्देशाने १००१ मास्क,सॅनिटायझर, हॅन्ड वॉश,ऑक्सीमिटर मशीन देऊन आपली सामाजिक जबाबदारी जोपासली आहे.
सामाजिक भान जोपासणारी मित्र मैफिल
 या मित्रांनी एकत्र येऊन मैत्री तर जोपासलीच आहे.परंतु  अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून यामध्ये शिक्षक सन्मान, गुणवंत विद्यार्थी सन्मान, व्यवसाय मार्गदर्शन, सोशल माध्यमा तून कोरोना जनजागृती, अशा अनेक उपक्रमांचा समावेश असून यापुढील काळातही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा या मित्र मैफिलीचा मानस आहे.यामुळे त्यांचे हे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरत आहे.
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक जीवन रेपाळ होते.कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक माणिक चौधरी,पांडुरंग यादव,मुख्याध्यापक बिभीषण पाटील,पर्यवेक्षक पाटील,माजी विद्यार्थी दादा रोकडे, आनंद पाटील,संजय खपाले, गणेश आढवळकर,सलीम पठाण,महेश लटके,दत्तात्रय भोसले,रेश्मा माळी,संजीवनी वेदपाठक, संध्या राणी खिस्ते आदी उपस्थित होते. 

    कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या माजी विद्यार्थ्यां कडून राबविण्यात येत असलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून हे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

   प्रस्ताविक शिक्षक सोमनाथ जगताप यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक पाटील यांनी मानले. हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी या बॅचमधील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. 

 मैत्रीच्या जिव्हाळ्यातुन साकारले कोरोना corona protection from intimacy of friendship
 
Top