मंगळवेढयाच्या भूमीपुत्राच्या खुलासाने  पंढरपूरच्या निवडणुकीत चुरस वाढली  
Who is the Opposition candidate from Pandharpur constituency?

    पंढरपूर /प्रतिनिधी - पंढरपूर मंगळवेढा विधान सभा मतदार संघाचे आ भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या पोटनिवडणुकीसाठी हालचाली गुप्त असल्या तरी गतिमान झाल्या आहेत. यामध्ये मंगळवेढ्याचे भूमिपुत्र आणि दामाजीचे चेअरमन उद्योजक समाधान आवताडे यांनी स्वतःहून खुलासा करीत आपणाला या पोटनिवडणूकसाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्हीही पक्षाकडून विचारणा होत आहे असे सांगण्यात येत आहे .त्यामुळे आवताडे हे या निवडणुकीत नेमकी कोणत्या पक्षाची उमेदवारी स्वीकारणार यावरूनच त्यांच्या विरोधात पंढरपूर भागातील आवताडे यांचा प्रतिस्पर्धी कोण असणार हे स्पष्ट होणार आहे.

     आवताडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपासून आपली तयारी चालू केली होती.पंढरपूर तालुक्या तील गावांमध्ये आपले उमेदवार उतरून गावोगावी आपले बस्तान बसविण्यात त्यांना यशही आले. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात क्रमांक एकवरच असणारे आवताडे यांची मताची आकडेवारी पाहूनच आता उमेदवारी देण्यासाठी दोन्हीही पक्ष तयारी दाखवीत आहेत.

     या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून विठ्ठल सहकारीचे चेअरमन भगीरथ भालके यांना तर भाजपकडून परिचारक कुटुंबातील कोणालातरी उमेदवारी मिळेल अशा चर्चा सुरू असून तर्क वितर्क आहेत.परंतु या पंढरपूरच्या दोन्ही प्रस्थापितांपैैैकी प्रतिस्पर्धी पैकी नेमके कोण असणार ते समाधान आवताडे यांच्या उमेदवारी वरून समजणार आहे.

          सध्या आवताडे यांचेही पंढरपूर भागातील भेट दौरे वाढले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागता साठीही गर्दीही होत आहे .या परिस्थितीमुळेच आवताडे यांनी पुन्हा एकदा नशीब अजमविण्या साठी तयारी बांधली असून कार्यकर्त्यातूनही  उत्साह वाढू लागला आहे.

         एकंदरीत आगामी पोटनिवडणुकीतील परिस्थिती विचारात घेता एकतर्फी वाटणारी निवडणूक समाधान आवताडेंच्या उमेदवारीच्या  चर्चेमुळे जोरदार लढत होईल त्यासाठी नेमका प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असणार याबाबत  मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे .
 
Top