विं.दा.करंदीकर

    मुंबई,११/०२/२०२१- राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीनं मराठी भाषेच्या प्रचार प्रसार आणि जतन संवर्धनासाठी दिले जाणारे पुरस्कार आज जाहीर झाले.यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे .

              साहित्यिक रंगनाथ पठारे

       मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली.यावर्षीचा श्री.पु.भागवत पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथल्या शब्दालय प्रकाशनला तर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.सुधीर रसाळ यांना,  कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत आणि आंध्र प्रदेशातल्या मराठी साहित्य परिषदेला जाहीर झाला आहे . 

    येत्या २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील असं,मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.

  विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार साहित्यिक रंगनाथ पठारे यांना
 Vinda Karandikar Lifetime Achievement Award to Literary Ranganath Pathare
 
Top