गोवा येथे आयोजित मिस्टर,मिस,मिसेस स्पर्धेत सोलापूरच्या दोघांनी पटकाविले विविध किताब

       गोवा- गोवा येथे दिनांक ०३ ते ०५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित मिस्टर,मिस,मिसेस स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे नमिश प्रवीण शहा यास बेस्ट फोटोजेनिक तर कन्या जव्हेरी हीस बेस्ट फॅशन आयकॉन या किताबाने गौरविण्यात आले.

    नमिश शहा याची मिस्टर स्पर्धेत पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये निवड झाली होती.कन्या जवेरी हीने मिस इंडिया या कॅटेगरीमध्ये थर्ड रनर अपचा किताब पटकाविला.

   ताजी ईव्हेन्टस अँड प्रोडक्शन्स द्वारा आयोजित या स्पर्धा गोवा येथे पार पडल्या.परेश मोकाशी या स्पर्धेचे मुख्य आयोजक होते.

    नमिश शहा व कन्या जव्हेरी यांना वायब्रेट इन्स्टिट्यूट फॉर मॉडेलिंगच्या सोनल जव्हेरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गोवा येथील स्पर्धेत सोलापूरच्या दोघांना विविध पुरस्कार Various prizes for two from Solapur in the competition in Goa
 
Top