पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात पंढरपुरात शिवसेनेची निदर्शने,तहसील कार्यालयसमोर चूल मांडून केला केंद्र सरकारचा निषेध
पंढरपूर,०५/०२/२०२१- देशातील सर्वसामान्य माणूस सतत होणार्या इंधन दरवाढीमुळे तो मेटाकुटीस आला आहे. पेट्रोल, डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल अशी अवस्था असून इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडत आहे.घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दरही मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत.देशातील जनतेत प्रचंड संताप असताना केंद्र सरकार मात्र मूग गिळून बघ्याची भुमीका घेत आहे असा आरोप करीत आज शिवसेनेच्यावतीने तहसील कायार्लयासमोर निदर्शने करीत चूल मांडून केंद्र सरकारचा निषेध करत असल्याचे निवेदन तहसीलदार विवेक साळूंखे याना देण्यात आले.


शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन

      यावेळी बोलताना शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे म्हणाले कि, गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल दरवाढ सतत सुरूच आहे.गेल्या चार वर्षांपूर्वी क्रूड तेलाचे जे दर होते तेच दर आजही कायम आहेत तरीही देशात इंधनाचे वाढत आहेत.कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यायचा नाही अशीच केंद्र सरकारची नीती आहे. महागाईच्या या भडकणार्या वणव्यातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले आहे.

   यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव,शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैलाताई गोडसे,तालुका प्रमुख महावीर देशमुख, शहर प्रमुख रवी मुळे,जयवंत माने,मा.शहर प्रमुख संजय घोडके,माउली अष्टेकर,काका बुराडे,प्रवीण शिंदे, महेश इंगोले,सुधाकर माळी,शांताराम यादव, नागेश पाटील, पोपट इंगोले,जयसिंग पवार, दामोदर ताटे,रणजित कदम, विलास चव्हाण, संजय कांबळे, शिवाजी जाधव,हरिभाऊ गाजरे, विजय करपे, कल्याण कवडे,उमेश काळे,रणजित कदम, बाळासाहेब पवार,उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, विनय वनारे,नाना सावंतराव,सचिन बंदपट्टे,तानाजी मोरे,विभागप्रमुख पंकज डांगे, अरुण कांबळे,सूरज गायकवाड,विलास थोरात, बाबा अभंगराव,ईश्वर साळूंखे,गणेश वाघमारे, महिला आघाडी शहर प्रमुख पूर्वा पांढरे,तालुका प्रमुख आरती बसवंती, संगीता पवार,रेहाना आतार,शेख भाभी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

दरवाढी विरोधात बैलगाडीत मोटारसायकल ठेवून शिवसेनेचे अनोखे आंदोलन 
Unique agitation of Shivsena by keeping motorcycle in bullock cart against price hike 
 
Top