सांगोला,दिनेश खंडेलवाल- लाकडी खुंंटीमध्ये स्वेटरची दोरी अडकल्यामुळे नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सांगोला तालुक्यात अचकदाणी येथे ही दुर्दैवी घटना घडली.

          घरी खेळत असताना स्वेटरमध्ये अडकून पडल्यामुळे एका नऊ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.सांगोला तालुक्यातील अचकदानीजवळील माळीवस्ती येथे ही घटना घडली. थंडीचा दिवस असल्याने सोहमने स्वेटर घातला होता. तो बेडच्या माथ्यावर एक मोठी खुंटी घेऊन घरात खेळत होता. खेळत असताना स्वेटरची दोरी अचानक खुंटीमध्ये अडकली आणि तो अडकला.जोरदार धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा शेजारील मित्र त्याला खेळायला बोलवायला आला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.जवळच असलेल्या शेतात काम करणारी आई घटनास्थळी धावली. आईच्या आक्रोशाने जमलेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू ओघळले.

सांगोला तालुक्यात घडली ही दुर्दैवी घटना This unfortunate incident happened in Sangola taluka
 
Top