महाविकास आघाडीच्यावतीने जंगी सत्कार

       पंढरपूर , प्रतिनिधी - पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांनी पंढरपूर येथे आभार दौरा केला.यामध्ये येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे महाविकास आघाडीच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

      या आभार दौऱ्याच्या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे,विठल सह साखर कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके,राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते युवराज पाटील, पंढरपूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिपक पवार,राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,पंढरपूर शहर अध्यक्ष सुधीर भोसले,चंद्रकांत देशमुख,अँड.राजेश भादुले, लतीफ तांबोळी, नरसाप्पा देशमुख,बाळासो पाटील,बाळासो यलमार,हेमंत पाटील,रमेश पाटील ,अरुण आसबे,श्रेया भोसले,साधना राऊत,अनिता पवार,सागर पडगळ व महाविकास आघाडी तील सर्व पक्षाचे पदधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिपक पवार यांनी केले.यामध्ये पदविधरांसाठी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या गावातून अभ्यासिका निर्माण करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली.

   सत्काराला उत्तर देतांना आ.लाड यांनी वरील मागणीचा नक्कीच विचार तर करूच परंतु पदवी धरांसाठी ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या सोडविण्यासाठी मी वचनबद्ध आहे अशी ग्वाही  आ.लाड यांनी दिली.

 पुणे पदवीधरचे आ.अरुण लाड यांचा पंढरपूर आभार दौरा Thanksgiving tour of Pune graduate MLA Arun Lad to Pandharpur
 
Top