पंढरपूर येथे अंधशाळेत शिक्षक तपासणी संपन्न

      पंढरपूर,(नागेश आदापूरे)- बुधवार दिनांक ०३/०२/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता शासनाच्या आदेशानुसार पंढरपूर नगरपरिषदेच्या सहकार्याने दिनांक २७/०२/ २०२१ बुधवार रोजी सर्व दिव्यांग निवासी शाळा सुरू करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून लायन्स क्लब पंढरपूर यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा, पंढरपूरमधील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ बी के धोत्रे यांनी व त्यांचे सहकारी सागर लिगाडे,उज्वला शेळके, अमृता देशमुख यांनी केली. अंधशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून याबाबत डॉक्टर व सर्व कर्मचारी व संस्था यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले.

   शाळेचे संस्थापक अध्यक्ष मुन्नागीर गोसावी यांनी डॉ बी के धोत्रे यांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करून आभार मानले. उर्वरित सहकाऱ्यांचे आभार अंधशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता पाटील यांनी मानले. सागर लिगाडे यांचे आभार महेश म्हेत्रे सरांनी तर उर्वरित सहकाऱ्यांचा सत्कार शाळेतील शिक्षकांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कटप सर यांनी केले.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून सहकार्य केले.याप्रसंगी मतिमंद विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रदीप कवडे सर व त्यांच्या सुविद्य पत्नी उपस्थित होते.

पंढरपूर येथे अंधशाळेत शिक्षक तपासणी संपन्न 
Teacher inspection completed in a blind school at Pandharpur
 
Top