रनर्स असोसिएशन पंढरपूर आयोजित डीव्हीपी पंढरपूर मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे आवाहन Take care of your health by participating in the DVP Marathon - Superintendent of Police    
    

      पंढरपूर /नागेश आदापूरे -दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी आय.एम.ए हॉल पंढरपूर येथे ७ ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या रनिंग मॅरेथॉनच्या टी-शर्ट, मेडल व प्रमाणपत्राच्या अनावरणप्रसंगी रनर्स असोसिएशन पंढरपूरच्या वतीने आयोजित डीव्हीपी मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले शरीर स्वास्थ्य जपावे ,असे आवाहन सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.


      प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या व डिव्हिपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पंढरपूरच्या विकासात भर टाकणारा हा कार्यक्रम असल्याचे वक्तव्य केले असून http://www.pandharpurmarathon.com या लिंक वरून नोंदणी करून व्हर्च्युअल मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवावा व पंढरपूर आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे सांगितले.

           या कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार,आय.एम.ए उपाध्यक्ष डॉ.मंदार सोनवणे,रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष भारत ढोबळे,खजिनदार विश्वंभर पाटील,रनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव बालाजी शिंदे, आभार डॉ.संगीता पाटील व सूत्रसंचालन रेखा चंद्रराव यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रनर्स असोसिएशनचे महेश भोसले, गणेश बागल व इतर सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
 
Top