पिंपरी चिंचवड येथील पूर नियंत्रण रेषेबाबत बांधकामास येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यवाही योग्य कार्यवाही करण्यात यावी तसेचपद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेच्या सर्वांगिण विकास प्रकल्पाच्या क्षेत्राला नियमानुसार किमान शक्य कर निर्धारणा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद,डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देशTake action to resolve construction issues regarding flood control lines
मुंबई. दि.०९ - पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेल्या पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरूत्थान समरसता गुरूकुलम् या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगिण विकास प्रकल्पाच्या क्षेत्राला किमान करनिर्धारणा देण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश दिले आहेत.पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीससंदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची विधानभवन, मुंबई येथे बैठक आयोजित केली होती.
श्री प्रभुणे यांच्या संस्थेने मालमत्ता कर भरला नाही म्हणून जप्तीची नोटीस काढण्यात आली होती. याबाबत सदरील नोटिसला डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ मध्यस्थी केल्यानंतर नोटिशीला स्थगिती मनपाने दिल्याबद्दल श्री प्रभुणे यांनी आभार मानले. तसेच पिंपरी चिंचवड येथील अनुदानित शैक्षणिक संस्थांना कर माफी देण्याबाबत काही निर्णय घेता येईल का याचा विचार करण्याची सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केली.
या आयोजित बैठकीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर,नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे, ॲड.सतीश गोरडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पवना नदीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. या पुलाच्या निमित्ताने संस्थेच्या दोन्ही मुख्य जुन्या इमारती पाडाव्या लागणार आहेत. यामुळे होणारी नुकसान भरपाई पिंपरी चिंचवड मनपा देणार आहे असून संस्थेच्या इमारत बांधण्यास परवानगी द्यावी अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केल्यानंतर आयुक्त श्री हर्डीकर यांनी मान्य करून योग्य कार्यवाही करण्यासाठी अश्वसित केले.
पिंपरी चिंचवड येथील गावठाणालगतच्या जमिनीचा समावेश गावठाणात केल्यास संस्था या ठिकाणी बांधकाम करू शकेल. या शाळांचा सामाजिक प्रकल्पासाठी नियमानुसार चिंचवड गावठाणात समावेश करावा असे निवेदन क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीचे अध्यक्ष श्री.गिरीश प्रभुणे यांनी सादर केले.
यासंदर्भात ही भटक्या विमुक्तांची कौशल्यावर आधारित निवासी शाळा नामवंतांनी गौरविली असून याबाबत शासनस्तरावर दखल घेतली आहे. नियमानुसार संस्थेला कर माफी देण्यासंदर्भात निर्णय देण्याच्या सूचना यावेळी उपसभापती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उपसभापतींच्यावतीने जलसंपदा विभागाशी चर्चा करून पूर नियंत्रण रेषेबाबत बांधकामास येणाऱ्या अडचणी सोडविण्या साठी कार्यवाही करावी अशा सुचना दिल्या जातील. गावठाणा लगतची जागा ही शेजारील रहिवाशी गट क्रमांकात घेण्या बाबत महसूल विभागाशी चर्चा करून नियमानुसार लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.