सर्व समाजातील जनतेला विश्वासात घेऊन ध्वनी प्रदुषण टाळणेसाठी नियमानुसार कार्यवाही करा -उपसभापती विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे
Take action as per rules to prevent noise pollution by taking people of all communities into confidence - Deputy Speaker of Legislative Council Dr.Neelam Gorhe


   मुंबई दि.१८ फेब्रुवारी २०२१ - नेहरुनगर कुर्ला (पूर्व) येथे भोंग्यांच्या आवाजाने होत असलेल्या ध्वनी प्रदुषणामुळे जनतेला त्रास होऊ नये यासाठी सर्व समाजातील जनतेला विश्वासात घेऊन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ आणि पोलीस विभागाने लवकरात लवकर नियमानुसार योग्य कार्यवाही करावी अशा सुचना महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विधानभवन येथील आयोजित बैठकीत दिल्या.

         उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे अध्यक्षते खालील बैठकीत आमदार मंगेश कुडाळकर यांनी नेहरुनगर , कुर्ला (पूर्व) येथे भोंग्यांच्या आवाजाने होत असलेल्या ध्वनी प्रदुषणाबाबत निवेदन सादर केले. यावेळी पर्यावरण विभागाचे संचालक नरेंद्र टोके, उप सचिव शु.द.आहेर,अतिरिक्त पोलीस आयुक्त,मुंबई प्रविण दराडे,पोलीस उपायुक्त विजय पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हर्षवर्धन आदी अधिकारी उपस्थित होते. 
     
      कोरोना प्रादुर्भावाच्या समस्यामुळे ऑफिसची कामे, मुलांच्या ऑनलाईन शाळा, कॉलेज तसेच इतर कामे घरातुन केली जातात. भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता अधिक असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी नागरिकांकडुन वारंवार प्राप्त होत आहेत. या समस्यांबाबत स्थानिक पोलीसां कडे बैठका घेण्यात आल्या असुन कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे  निवेदन आमदार कुडाळकर यांनी सादर केले. 

     उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,सर्व समाजा तील सण उत्सव सतत सुरु असतात. भोंग्यांना दिलेल्या परवानगीबाबत शहानिशा करून संपूर्ण शहरात ध्वनी प्रदुषण होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करावी.तसेच शांतता समितीची बैठक बोलावून सर्व समाजांना विश्वासात घेऊन भोंग्यांची तीव्रता नियमानुसार व्हावी यासाठी महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ व पोलीस विभागाने तात्काळ  कार्यवाही करावी. यासाठी भोंग्यांच्या परिसरात रेकॉर्डींग केले जाईल अशा पध्दतीची सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी,असे‍ निर्देश उपसभापती यांनी दिले.

        ध्वनीप्रदुषणा संदर्भात १० मिनीटांचे सादरी करण तयार करुन सर्व जनतेमध्ये सद्भाव व शांतता राहिल या पध्दतीने संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. कांदिवली संदर्भात मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. १७३/२०१० मध्ये दिलेल्या निकालपत्राचा अभ्यास करुन पोलीसांनी लवकरात लवकर ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी  योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देवून सर्व धर्मीय महिला,वृध्द,परिसरातील नागरिक यांच्या बैठका घेण्यात याव्यात अशाही सुचना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत . 
 
Top