कुर्डुवाडी/राहुल धोका - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुमेध फाऊंडेशनद्वारा युवती व महिलांसाठी आयोजित तीन दिवसीय मोफत स्वरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना मानाचे स्थान असून, उत्तम पिढी घडविण्याचे मोठे कार्य महिला करतात. सुमेध फाऊंडेशनच्यावतीने महिलांसाठी आयोजित विविध शिबीरांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगता समारंभात केले.
स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संस्कारांची मुल्ये आजच्या मातांनी त्यांच्या मुलांना दिल्यास देशात कोणत्याही स्त्रीला असुरक्षित वाटणार नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली महाराष्ट्र भुमीत अनेक शौर्यवान स्त्रीयांचे कार्य वाखाणण्या जोगे आहे, त्यांची प्रेरणा प्रत्येक स्त्रीने घ्यावी असे सुमेध फाऊंडेशनच्या अध्यक्षा जानवी माखिजा यांनी त्यांच्या प्रास्ताविकेत नमूद केले.
प्रचिता जोगदंड,चेतना म्हेत्रे आणि कावेरी कुडते यांनी सहभागी प्रशिक्षणार्थी महिलांचे प्रात्यक्षिके दाखवुन प्रशिक्षण दिले. तीन दिवसीय शिबीरात सहभागी शिबिरार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सुमेध फाऊंडेशनच्यावतीने आयोजित कार्यशाळे दरम्यान फाऊंडेशनचे रती माखिजा,भारती माखिजा, युक्ता माखिजा, राज माखिजा आणि विषेश अतिथी संध्याराणी बंडगर उपस्थित होते.
शिबिराचे सुत्रसंचालन अश्विनी जगताप यांनी केले.आभार श्रीकांत अंजुटगी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्तिकी गाडे, अर्जुन अष्टगी, सचिन जगताप आणि विजय कुंदन जाधव यांनी परिश्रम घेतले.