विमानतळ पोलीस स्टेशन येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेची उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल...

       पुणे,दि.१५ /०२/२०२१ - पुणे शहरात विमानतळ पोलीस स्टेशन अंर्तगत एका अल्पवयीन मुलीवर परराज्यातील कामाला आलेल्या सिक्युरिटी गार्डने बलात्कार गेल्याची घटना समोर आली. यानंतर तात्काळ उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना संपर्क करून कडक कारवाई करण्याची निदेश दिले आहेत.

       सदर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार हे अतिशय चांगले अधिकारी असून त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. अनेक गुन्ह्यात त्यांनी योग्य तपास करून आरोपींना अटक केली आहे. या केसमध्येही ते योग्य कार्यवाही करण्यात येईल असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याचे दिले आश्वासन...

   या घटनेतील पीडित कुटुंब आणि पीडित मुलीचे समुपदेशन करण्याचे सूचना डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस निरीक्षण यांना दिले. तसेच मनोधैर्य योजने अंतर्गत मदत तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनास शीघ्र प्रस्ताव पाठविण्याचे निदेश देखील ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिले. याबाबत निर्देश स्वीकारून उचित कार्यवाही करण्यात येईल असे श्री पवार यांनी सांगितले.

       पीड़ित कुटुंबासमवेत दूरध्वनीवरून ना.डॉ.गोऱ्हे यांनी संपर्क करून त्यांना धीर दिला व त्यांना पीडित मुलीच्या उपचारासाठी आर्थिक मदत शिवसेनेच्यावतीने उपशहरप्रमुख आनंद गोयल यांच्या हस्ते देण्यात आली.

 बलात्काराचे घटनेतील आरोपीवर कडक कारवाईचे निदेश - ना.डॉ.नीलम गोऱ्हे 
Strict action directed against accused in rape case - Dr. Neelam Gorhe
 
Top