सोलापूर जिल्ह्यातील ऊसबिलासाठी सहकार मंत्र्यांना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे निवेदन Statement of Swabhimani Shetkari Sanghatana to the Minister of Co-operation for Usbila in Solapur district
 पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यानी गाळप हंगाम 2020/21 सुरु होऊन आज चार महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले गाळप हंगाम काही दिवसात संपेल तरीही जिल्ह्यातील साखर कारखान्यानी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची बिले ( पुर्ण एफ.आर.पी ) दिलेली नाहीत.     कायद्यानुसार ऊस गाळप झाल्यापासून १४ दिवसात एफ आर पी देणे बंधनकारक असताना सोलापूर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी (एक दोन कारखान्याचा अपवाद वगळून) एफ आर पी ची रक्कम जमा केलेली नाही. अतिवृष्टी मुळे ऊसाचे एकरी उत्पादन घटलेले आहे कारखाने जो दर देत आहेत त्यात शेतकऱ्यांना उत्पादन खर्च ही निघत नाही,त्यातच शेतकऱ्यांच्या ऊस बिलातुन शेतकऱ्याची सहमती न घेता विविध बॅंकाची कर्ज वसुली सुरु आहे.शेतकरी कोरोना लॉकडाऊन, अतिवृष्टीमुळे शेतकरी अर्थिक अडचणीत आहेत, कायद्यानुसार एक रकमी एफ.आर.पी न देणाऱ्या साखर कारखान्यानवर आरआरसी ची कार्यवाही करण्याची आदेश साखर आयुक्त यांना देऊन शेतकऱ्यांच्या हक्कची एफ.आर.पी देण्यास कारखानदारांना भाग पाडावे ,जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना हक्काची ऊसबिले मिळवून देण्या साठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना लक्ष घालण्याची मागणी स्वाभीमानीच्यावतीने निवेदन देऊन केली.


        यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, जिल्हा उपाध्यक्ष पप्पु पाटील,राहुल हातगिने,सचिन मस्के,अब्बास मुलाणी आदी उपस्थित होते.
 
Top