लोककला स्पर्धेत बावधनचे पथक दुसरे राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा ; श्रीनाथ प्रतिष्ठानकडून अवयव दानाच्या गोंधळाचे Srinath Pratishthan Bawadhan's team came second in the state level folk art competition सादरीकरण 
    

       प्रकाश इंगोले, ०६/०२/२०२१- वाई ,ता बावधन (ता.वाई) येथील श्रीनाथ प्रतिष्ठाननिर्मित जनजागृती पथकाने ऑनलाइन लोककला स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला . नाशिक येथील मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स् यांच्या वतीने कोरोना लॉकडाउनच्या काळात राज्यस्तरीय ऑनलाइन लोककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत मुंबई ,पुणे,नाशिक ,औरंगाबाद , कणकवली,गडहिंग्लज,वाई संघांनी भाग घेतला होता . 

     राज्यस्तरीय ऑनलाइन कला स्पर्धेत श्रीनाथ प्रतिष्ठानचे अर्जुन लगस व सहकलाकारांनी 'अवयव दानाचा गोंधळ ' सादर केला . या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मधुरा बेळे यांनी काम पाहिले . या ऑनलाइन श्रीनाथ प्रतिष्ठान निर्मित जनजागृती या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर स्पर्धेत बावधन (ता.वाई ) येथील पथकाने सादर केलेल्या ' अवयव दानाचा गोंधळ ' या कला प्रकारास द्वितीय क्रमांकाचे ३ हजार रुपयांचे पारितोषक व प्रमाण पत्र प्राप्त झाले आहे . शाहीर अर्जुन लगस व त्यांच्या सहकारी कलावंतांनी आपल्या पहाडी आवाजात व रंगतदार शैलीतून अवयव दानाचा गोंधळ सादर केला.या गोंधळाचे मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशनचे संचालक डॉ.भाऊसाहेब मोरे , डॉ.सुनील देशपांडे ,रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय जोशी, प्रकल्प प्रमुख विराज गडकरी यांनी कौतुक केले . या यशाबद्दल शाहीर अर्जुन लगस व त्यांच्या सर्व सहकारी कलाकारांचे वाई रोटरीचे अध्यक्ष अजित क्षीरसागर,डॉ.शंतनू अभ्यंकर ,प्रा.नितीन कदम तसेच बावधन ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे .
 
Top