पंढरपूर,दि.१२/०२/२०२१- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा विवाह सोहळा परपरेनुसार माघ शुध्द ५ ( वसंत पंचमी ) दि . १६/०२/२०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न होत आहे . दरवर्षी माघ शुध्द १ ते माघ शुध्द ५ या कालावधीत सदर सोहळा संपन्न होतो . तथापि , सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका अद्यापही कायम असल्याने यावर्षीचा श्री विठ्ठल रूक्मिणी विवाह सोहळा प्रतिकात्मक व मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येत आहे.


   आज शुक्रवार,दि.१२/०२/२०२१ रोजी दु .४.०० वाजता श्री विठ्ठल सभामंडप येथे " रूक्मिणी स्वयंवर " कथा देवी वैभवीश्रीजी,पुणे यांनी कथन केली .यावेळी मंदिरे समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर,उपजिल्हाधिकारी तथा कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी,मंदिरे समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते .

श्री विठ्ठल रूक्मिणी विवाह सोहळा Sri Vitthal Rukmini Wedding Ceremony
 
Top