कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात संपन्न Shiv Jayanti celebrations at Karmaveer Bhaurao Patil College

       पंढरपूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कुंडलिक एच शिंदे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. 

     यावेळी उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक,उपप्राचार्य चंद्रकांत रासकर,रुसा समन्वयक डॉ.बजरंग शितोळे,स्वायत्त समन्वयक डॉ.मधुकर जडल,अधिष्ठाता प्रोफेसर डॉ.तानाजी लोखंडे, विद्यार्थी कल्याण विभाग अधिष्ठाता डॉ.सुखदेव शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.राजाराम राठोड,महाविद्यालय अंतर्गत सुधार समितीचे समन्वयक डॉ.अमर कांबळे, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव आदी मान्यवरांसह सिनिअर व ज्युनिअर विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
 
Top