मराठा महासंघ पंढरपूर यांच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी होणार Shiv Jayanti will be celebrated with enthusiasm on behalf of Maratha mahasangh  Pandharpur


     पंढरपूर, १५/०२/२०२१- अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नेहमीप्रमाणे मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्याचे नियोजन झाले असून शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी विजय डुबल, उपाध्यक्षपदी चरण गायकवाड यांच्या नियुक्त्या जिल्हा सचिव गुरूदास गुटाळ,पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष जाधव,शहराध्यक्ष अमोल पवार,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे,शहर संघटक काका यादव,पांडुरंग शिंदे,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,रिक्षा संघटना उपाध्यक्ष यशवंत बागल,मालवाहतूक संघटना अध्यक्ष श्रीनाथ माने,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रणव गायकवाड,विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष जिवन गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या.

      तसेच पुढील दिशा व शिवजन्मोत्सव सोहळ्याची रुपरेषा ठरवण्यासाठी मिटिंग बुधवार दि १७/०२/२०२१ रोजी सायं ७.०० वा कुकाजी पाटील कॉम्प्लेक्स गांधी रोड पंढरपूर येथे आयोजित केली असून शिवप्रेमी,समाज बांधव,मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांना केली आहे. 
 
Top