पंढरपूर,०७/०२/२०२१ - ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शरदोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम व शारदाई पुरस्काराचे वितरण करण्यात येते. पण यंदाच्या वर्षी कोरोना महामारीचा विचार करता सांस्कृतिक कार्यक्रम न घेता फक्त शारदाई पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांना शारदाई पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
यामध्ये सौ.रंजना श्रीधर आवटे(प्रसिध्द लेखक व पत्रकार संजय आवटे यांच्या मातोश्री माढा),सौ. चांगुणा दिनकर भोसले (सांगोला), सौ. सुवर्णलता रामदास भाजीभाकरे (जिल्हाधिकारी सौ.रोहिणी भाजीभाकरे व पोलीस उपायुक्त संदिप भाजीभाकरे यांच्या मातोश्री बार्शी),श्रीमती लोपामुद्रा सुरेश पाटील (उमेश पाटील जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्या मातोश्री मोहोळ),श्रीमती गोपाबाई रामचंद्र साबळे (श्रीकांत साबळे दैनिक पुण्यनगरी पुणे यांच्या मातोश्री पंढरपूर), सौ.सुनंदा पुंडलिक खांडेकर (श्रीकांत कुंडलिक खांडेकर आय.ए.एस.अधिकारी यांच्या मातोश्री मंगळवेढा), सौ. यमुनाबाई जालिंदर काळेल (महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे यांच्या आत्या करमाळा), सौ.पद्मिनी रावसाहेब राऊत (साहित्यीक अनिल राऊत यांच्या मातोश्री मोहोळ), सौ.विद्या सुभाष क्षिरसागर (मयुरा पराग शिंदेकर असि. डायरेक्टर स्मार्ट सिटी यांच्या मातोश्री माळशिरस), सौ.कमल नामदेव गाडवे (मारूती गाडवे उद्योजक पुणे यांच्या मातोश्री माळशिरस),सौ.लक्ष्मी महावीरसिंग राठोड (बार्शी विजय राठोड पी.एस.आय.यांच्या मातोश्री) अशा कर्तृत्ववान मातोश्रींना यंदाचा शारदाई पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
मुलांना आदर्शवत व्यक्ती म्हणून घडविणाऱ्या मातांचा सन्मान
समाजामध्ये आपला कौटुंबिक गाडा चालवित असताना येणाऱ्या अनंत अडचणींना तोंड देत आपल्या अडचणी बाजूला ठेवून आपल्या मुलांना समाजामध्ये आदर्शवत व्यक्ती म्हणून घडविणाऱ्या मातांचा सन्मान करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात पंढरपूर शहरात ज्या प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांनी जनतेची इमानेइतबारे सेवा केली अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा त्यामध्ये पंढरपूर प्रांताधिकारी सचिन ढोले ,तत्कालिन पोलिस उपविभागीय अधिकारी सागर कवडे, सोलापूर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उमटविल्याबद्दल रणजितसिंह डिसले सर व करमाळा तालुक्यात बिबट्याने हैदोस घातल्यानंतर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्याला ठार मारून अनेकांचे जीव वाचविणारे धाडसी व्यक्तीमत्व डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,किरण घोडके, नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,कविताताई चव्हाण,सुहास कदम,रूपेश भोसले,रफिक नदाफ,स्नेहल परचंडे, सुरज सरवदे,सुनिल दिवाण आदी मान्यवरांचाही कोरोना रक्षक म्हणून सन्मान करून गौरवण्यात येणार आहे,अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.