मदत व पुर्वसनमंञी वड्डटीवार यांची भेट घेऊन शरद कोळी यांनी केली ओबीसी प्रश्नांवर चर्चा

    पंढरपूर,(प्रतिनिधी)-मदत व पुर्वसन कॅबिनेट मंत्री विजय वड्डेटीवार यांची महाराष्ट्र ओबीसी युवक प्रदेश अध्यक्ष शरद कोळी यांनी मंञालय येथे भेट घेऊन महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण तसेच ओबीसी समाज्यातील महिला व विद्यार्थी आदी विविध प्रश्नांवर चर्चा करून एकंदरीत महाराष्ट्रामधिल स्थानिक पातळीवर ओबीसी समाज्यामधिल नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावत असलेल्या बाबींची माहिती दिली .

     शरद कोळी यांना आपण याच पद्धतीने राज्यभर जोमाने काम करा.मी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आपल्या कायम पाठीशी राहिन व आपण मांडलेल्या प्रश्नांवर लवकरात -लवकर त्याबाबतची माहिती घेऊन ते सर्व प्रश्न सोडवण्या साठी तत्पर असल्याचे राज्याचे मदत व पुर्वसन मंञी विजय वड्डेटीवार यांनी शरद कोळी यांना आश्वासित केले असल्याचे कोळी यांनी सांगितले आहे.

     या भेटीवेळी बाळासाहेब सानप अध्यक्ष नाभिक समाज महाराष्ट्र, सोमनाथ काशीद संपर्कप्रमुख, बालाजी शिंदे महासचिव, अरुण खरमाटे, प्रदेश उपाध्यक्ष, लक्ष्मण हाके, प्रदेश कार्याध्यक्ष, साधना राठोड, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा आण्णा शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

मदत व पुर्वसनमंञी वड्डटीवार यांची भेट घेऊन शरद कोळी यांनी केली ओबीसी प्रश्नांवर चर्चा Sharad Koli discussed OBC issues with Maddat Purvasanamani Vaddatiwar  
 
Top