पंढरपूर -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात पक्ष वाढीच्या दृष्टीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आपणास देण्यात येत आहे.पुढील काळात पक्षाला बळकटी यावी आणि पक्ष मजबुतीने उभा रहावा यासाठी आपली निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम भाऊराव साठे यांनी पंढरपूरचे संदीप औदूंबर मांडवे यांना दिले आहे.


संदीप औदूंबर मांडवे यांची राष्ट्रवादी कांँग्रेस पार्टी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या (फादर बाॅडी) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठेने केलेल्या कार्याची दखल घेत वरिष्ठांनी जबाबदारीचे पद दिले आहे. या पदाचा वापर सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवत पक्ष वाढीचे काम करणार आहे असे संदीप औदूंबर मांडवे यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले.

संदीप औदूंबर मांडवे यांच्या राष्ट्रवादी कांँग्रेस पार्टी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या (फादर बाॅडी) अध्यक्षपदी नियुक्तीमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.हे नियुक्ति पत्र सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम भाऊराव साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले, विठ्ठल सहकारीचे चेअरमन भगिरथ भालके,नितीन आसबे,श्रीकांत शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांच्या उपस्थितित दिले.

संदीप मांडवे राष्ट्रवादीच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी
Sandeep Mandve President of NCP's Pandharpur Mangalvedha Assembly Constituency
 
Top