पेट्रोलवर अतिरिक्त अधिभार नागरिकांच्या खिश्याला न परवडणारा

      पंढरपूर,(प्रतिनिधी),०२/०२/२०२१ -काल केंद्र सरकारने २०२१ - २२ चा केंद्रीय अर्थसंकल्प संसंदेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पात देशातील सर्व स्तरातील नागरिकांचे प्रामुख्याने लक्ष लागून राहिले होते ते पेट्रोलचे दर स्थिर राहणार - वाढणार की कमी होणार याकडे परंतु नागरिकांना या पेट्रोल दराच्या बाबतीत काही दिलासा तर मिळालाच नाही उलट पेट्रोलवर अतिरिक्त चार रूपयांचा अधिभार लावण्यात आला तो नागरिकांच्या खिश्याला न परवडणारा आहे.

          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षभरापासून अनेकांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे तर अनेक जणांना बेरोजगार व्हावे लागले असल्याने नागरिक विविध प्रकारच्या आर्थिक अडचणीत असताना रोजच्या वापरात असलेल्या पेट्रोलचे दर सध्याच शंभरीला असताना त्यावर येत्या काही दिवसांमध्ये आणखी चार रूपयांचा जो अतिरिक्त अधिभार केंद्र सरकारने चुकीच्या पध्दतीने व जन भावना लक्षात न घेता एकतर्फी निर्णय असून स्पष्ट पणे नागरिकांची सरकार फसवणूक करत आहे.

सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली लेखी निवेदनाद्वारे मागणी 

  हा निर्णय केंद्र सरकारने जनभावना लक्षात घेऊन लवकरात -लवकर मागे घ्यावा अन्यथा काॅग्रेस सरकारला ज्या पध्दतीने जनतेने त्यावेळी पेट्रोल दर वाढीच्याच मुद्दावरून सत्तेवरून हटवले त्याच पध्दतीचा अवलंब करण्यास जनतेला आपण भाग पाडू नये असे मत धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी लेखी निवेदना द्वारे सोलापूर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे मागणी केली आहे. 

      केंद्र सरकारला महसुलासाठी आर्थिक नियोजन गरजेचे असते तेही तितकेच खरे आहे तर त्या साठी पेट्रोलवरील लावलेला अतिरिक्त चार रूपयांचा अधिभार काढून तो सरकारने दारूवरती लावावा असेही शरद कोळी यांनी सदर लेखी निवेदनामध्ये नमूद केले आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलवर अतिरिक्त चार रूपयांचा लावलेला अधिभार काढून तो दारूवर लावावा - शरद कोळी Remove surcharge on petrol and put it on alcohol - Sharad Koli
 
Top