महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र कोरके पाटील Rajendra Korke Patil as rajya Marathi Patrakar sangh

  पंढरपूर - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी दैनिक महान कार्याचे सोलापूर जिल्हा उपसंपादक राजेंद्र कोरके पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. सदरची निवड पुणे येथील संघाच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते करण्यात आली. पुणे येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये संजय भोकरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष, वसंतराव मुंडे ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे ,त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये पुणे विभागीय अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नितीन शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. 

 या बैठकीसाठी दैनिक राष्ट्रगीतचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कुमार कोरे, ज्ञानप्रवाह न्यूज चैनलचे पंढरपूर शहर प्रतिनिधी नागेश आदापुरे, दैनिक एकमत सांगोला प्रतिनिधी विकास गंगणे, दैनिक लोकमतचे ग्रामीण प्रतिनिधी रामदास नागटिळक,  मंगळवेढ्याच श्री राजमाने,श्री राक्षे,श्री संजय ननवरे ,न्यूज चैनलचे अशोक पवार आदीसह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पंढरपूर शहर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
 
Top