पंढरपूर/नागेश आदापूरे,०४/०२/२०२१- DVP चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील, पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार व तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.


     ग्रामीण युवकांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे,पण त्यांना यथायोग्य संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. संधी उपलब्ध करून देण्याचा मूळ हेतू केंद्रस्थानी ठेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 


       भारतात प्रसिद्ध असलेल्या क्रिकेट आदी खेळांव्यतिरिक्त इतर क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे हा देखील यामागील हेतू आहे.


Quality is widely available among rural youth, but they need to be given opportunities
जितके जास्त क्रीडा प्रकार प्रसिद्ध होतील तितक्या अधिक संधी उपलब्ध करून देता येतील अशी व्यापक भूमिका यामध्ये आहे.


   यापूर्वी १९८३ मध्ये पंढरपूर येथे अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर आजच अशी स्पर्धा आयोजित होत आहे.त्यामुळे पंढरपूर येथील क्रीडाप्रेमी नागरिक आणि युवक अत्यंत आनंदित झाले आहेत. पांडुरंगाच्या पावन चरण स्पर्शाने पावन झालेल्या आणि भक्तांची मांदियाळी असलेल्या आपल्या पंढरपूरला क्रिडेची पंढरी देखील ओळख मिळावी अशी माझी मनीषा आहे. ही स्पर्धा त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे असे डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.


         या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख साईनाथभाऊ अभंगराव, नगरसेवक महादेव धोत्रे, संजय ननवरे,विशाल मर्दा, पांडुरंग बोडके,भालचंद्र देवधर सर,डॉ.आरिफ बोहरी, विक्रमसिंग भोसले,अर्जुन पवार,फुटबॉल प्रशिक्षक किरण जाधव सर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख  सुधीर अभंगराव, युवराज मुचलंबे,ओंकार जोशी, ओंकार वाळूजकर, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य संजय अभ्यंकर,विठाई फुटबॉल क्लबचे सर्व सदस्य, मान्यवर, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण युवकांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे,पण त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची Quality is widely available among rural youth, but they need to be given opportunities
 
Top