पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कर्मवीरच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके
Punyashlok Ahilya Devi Holkar Gold medals for Karmaveer students at Solapur University

पंढरपूर – “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १९-२० मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालया तील विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर परीक्षेत सहा सुवर्णपदके प्राप्त केली .विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

        शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतलेल्या बी.कॉमच्या पदवी परीक्षेत कु. वैष्णवी मुकुंद कावळे या विद्यार्थिनीने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून श्रीमती चंद्रभागा पांडुरंग बंडगर सुवर्ण पदक व द इन्स्टिट्यूट ऑफ जी १८ सी.ए. ऑफ इंडिया गोल्ड मिडल प्राप्त केले आहे. कु.प्रियांका रामराव परचंडे या विद्यार्थिनीस बी.कॉम तीनच्या अकौंटंसी विषयात (कै)श्रीमान भाऊसाहेब गांधी सुवर्णपदक मिळाले आहे.

        मराठी विषयाच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेत प्रशांत श्रीधर शिंदे या विद्यार्थ्यास विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल डॉ. निर्मलकुमार फडकुले सुवर्णपदक तर कु.स्नेहा रामदास रावळे या विद्यार्थिनीस विद्यापीठात पदव्युत्तर पदवी परीक्षेत विद्यार्थिनीमध्ये प्रथम आल्याबाबत कै.प्रा.डॉ.राजशेखर गंगाधर हिरेमठ सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.बी.ए.पदवी परीक्षेत हिंदी विषयातून विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल कु. शीतल वसंत गायकवाड हीस कै.प्रभाकर दिगंबर शिरवळकर सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

        महाविद्यालयाच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भाई गणपतराव देशमुख, चेअरमन डॉ.अनिल पाटील, सचिव प्रिन्सिपल डॉ. विठ्ठल शिवणकर, उच्च शिक्षण सहसचिव प्रिन्सिपल डॉ.प्रतिभा गायकवाड,ऑडीटर
प्रिन्सिपल डॉ.शिवलिंग मेनकुदळे,मध्य विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांस अनुक्रमे उपप्राचार्य डॉ.निंबराज तंटक, प्रा.डॉ.बजरंग शितोळे,प्रा.तुकाराम अनंतकवळस, प्रा.सागर शिवशरण,प्रा.रघुनाथ भोसले,प्रा.सारिका केदार,प्रा.डॉ. राजाराम राठोड,प्रा.सुभाष कदम, प्रा.डॉ.रमेश शिंदे, प्रा.डॉ. दत्तात्रय डांगे, प्रा.कु. सारिका भांगे,प्रा.डॉ.फैमिदा बिजापुरे, प्रा.डॉ.प्रशांत नलवडे, प्रा.चतुर्भुज गिड्डे, प्रा.अमोल मोरे यांनी मार्गदर्शन केले.
 
Top