कुर्डुवाडीतील के.एन.भिसे महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार Punyashlok Ahilya Devi Holkar Award to KN Bhise College, Kurduwadi
कुर्डूवाडी/राहुल धोका - कुर्डूवाडी येथील के.एन.भिसे महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाला असून गेली वीस पंचवीस वर्षांमध्ये केलेल्या कार्याचा व उपक्रमाचा फार मोठा वाटा आहे .गेल्या पंचवीस वर्षांमध्ये विज्ञान शाखा सुरू करणे, मुलीचे वसतिगृह सुरू करणे,परिसर विकसित करणे, क्रीडांगण विकसित करणे,एनसीसीची उत्कृष्ट कामगिरी,इमारती बांधकाम,इनडोअर स्टेडियम,वृक्षारोपण इत्यादी गोष्टींमुळेच महाविद्यालयास हा बहुमान मिळाला आहे .त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील,सचिव शामसुंदर भिसे,प्राचार्य डॉ.आर. आर.पाटील, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे .
या महाविद्यालयात परिसरातील हजारो विद्यार्थी प्रशिक्षित झाले असून डॉ विलास मेहता, प्रा.प्रमोद शहा,डॉ.जयंत करंदीकर,फुलचंद धोका,किरण गोडसेंसह अनेक मान्यवरांनी महाविद्यालयाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो असा शुभेच्छा संदेश सोशल मिडियाद्वारे दिला आहे.