DVP फुटबॉल टूर्नामेंट स्पर्धेचे बक्षीस वितरण
Prize distribution of DVP football tournament competition


 पंढरपूर,(नागेश आदापूरे)-DVP फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मनसेचे शँडो मंत्री दिलीप धोत्रे,डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील,अमित साळुंखे, युवराज अभंगराव, सुयोग इलेक्ट्रिकचे अनिष शेख,ॲटलान्सचे शंकर सर, फुटबॉल कोच अध्यक्ष आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.


    या खेळांमध्ये २५ जिल्ह्यातून संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये सांगलीच्या संघानी प्रथम पारितोषिक पटकावले असून दुसरे फलटण आणि तिसरे पंढरपूरच्या विठाई संघाने जिंकले.


     आरोग्य रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने मैदानी खेळांमध्ये युवकांचा सहभाग वाढावा म्हणून या स्पर्धांचे आयोजन केले होते. 


  प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ही स्पर्धा संपन्न झाली असून अत्यंत चुरशीचे असे सामने पाहायला मिळाले. अशा प्रकारच्या खेळांमधून युवकांमधील संघटन देखील वाढत असल्याची जाणीव होते. यातूनच सर्वांगीण विकासाला देखील प्रगती मिळू शकेल हा विश्वास डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला .
 
Top