हैदराबाद - प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या प्रेमकहाणीच्या वावड्या सतत उठत होत्या. परंतु प्रभासने मात्र या सर्व बातम्या फेटाळून लावल्या होत्या.आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे तो म्हणाला होता.


      साऊथ अभिनेता प्रभास सध्या बॅक टू बॅक सिनेमांमुळे चर्चेत असला तरी त्याच्या लव्ह लाईफची चर्चाही कमी झालेली नाही.प्रभास हा दक्षिणेकडील ‘मोस्ट हँडसम बॅचलर’ मानला जातो. लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ असलेला प्रभास अद्यापही अविवाहित आहे तर दक्षिणेची सौंदर्यवती अनुष्का शेट्टी हिने सुद्धा अद्याप लग्न केलेले नाही. ‘बाहुबली’त अनुष्का व प्रभासच्या केमिस्ट्रीने जगभर धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून प्रभाससोबत अनुष्काचे नाव जोडले जात होते. अनुष्का व प्रभासच्या प्रेमाच्या चर्चा अधुनमधून सुरु असतात.

       प्रभास लवकरच लग्न करणार आहे मात्र  अनुष्का शेट्टीसोबत नाही तर त्याची होणारी वधू एनआरआय असल्याचे कळतेय. टॉलिवूड डॉट नेटने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभास अमेरिकास्थित एका सॉफ्टवेअर कंपनीच्या फाऊंडरच्या मुलीशी लग्न करणार आहे. हे अरेंज मॅरेज असणार आहे. दोन्ही कुटुंबांसह प्रभासने या स्थळाला होकार दिल आहे.प्रभासचा ‘राधेश्याम’ हा आगामी सिनेमा युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करत आहेत.या चित्रपटात प्रभासबरोबर अभिनेत्री पूजा हेगडे असणार आहे. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होणार आहे.राधेश्याम या सिनेमाच्या रिलीजनंतर प्रभास लग्नबेडीत अडकणार,अशी चर्चा आहे कारण या लग्नाची तयारीही सुरु झाली आहे .

प्रभास साउथचा मोस्ट हैंडसम बैचलर Prabhas South's Most Handsome Bachelor

 
Top