पंढरपूर मंगळवेढ्याचे मतदार पक्ष नाही तर व्यक्ती बघून निवडतात आमदार Pandharpur Mangalwedha's electorate is not a party but an MLA

   पंढरपूर,(प्रतिनिधी)-पंढरपूर-मंगळवेढा हा 252 जाॅईट विधानसभा मतदारसंघ २००९ सालापासून अस्तित्वात आला असून याअगोदर या दोन्हीही तालुक्यात स्वतंञ विधानसभा मतदारसंघ होते. २००९ सालापासून आजपर्यंत या मतदार संघात गेल्या तीन पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही एका राजकीय पक्षाचे प्राबल्य दिसून न येता ते व्यक्ती केंद्रीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    याचे कारण म्हणजे २००९ सालच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीमधील शिवसेनेच्या उमेदवारास अगदी जेमतेम ३३३० एवढीच मते मिळाली होती तर २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराची घौडदौड ही ३ हजार ७५ मतांवरच थांबली होती.२०१९ मधील निवडणुकीत काॅग्रेसच्या उमेदवारासही फक्त ७ हजार २०२ मते मिळाली होती. 

    यावरूनच असे दिसत आहे की या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील मतदार निवडणुकीत पक्ष नाही तर व्यक्ती बघून आमदार निवडतात हे भालके यांना येथील मतदारांनी....ते तीन वेळा वेगवेगळ्या पक्षात असूनही भरघोस मतांनी निवडून दिले यावरून हे सिद्ध होत आहे .
 
Top