पोटनिवडणूक लढूनच बहुजन समता पार्टी आपले राजकीय वजन दाखवून देणार - संस्थापक प्रा मच्छिंन्द्र सकटे Founder Prof.Machhindra Sakte 

       पंढरपूर/प्रतिनिधी,१५/०२/२०२१ - येथील शासकीय विश्रामगृह येथे बहुजन समता पार्टीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये नवीन पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी पार्टी वाढीसाठी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये या भागातील होणारी पंढरपूर मंगळवेढा विधान सभेच्या निवडणुकीत आपल्या या नवीन पार्टीचा उमेदवार उतरवून निवडणूक लढविण्याची घोषणा प्रा.मच्छिद्र सकटे यांनी केली आहे.

        हा उमेदवार कोण असेल हे अद्याप अस्पष्ट असले तरी पार्टीच्या उमेदवार प्रचाराचा एक भाग म्हणूनच येत्या १ मार्च रोजी क्रांतिवीर फकिरा राणोजी साठे यांच्या जयंतीनिमित्ताने या मतदार संघातून एक जनसंवाद यात्रेस सुरुवात करणार असल्याचे प्रा.सकटे यांनी सांगितले.

   जनसंवाद यात्रेतून प्रत्येक गावात लोकांना या नवीन पार्टीची ध्येय धोरणे पटवून देण्यात येणार आहेत.पंढरपूर हे देवभूमीच नाही तर समता भूमीही आहे.वंचीतामधील वंचितलाही सोबत घेऊनच ही लढाई करणार असल्याचेही सांगितले.

       सदरची जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नवीन पदाधिकारी यांच्या नावाची घोषणा ही करण्यात आली यामध्ये मोहोळ तालुका अध्यक्षपदी राम नागनाथ माने, सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी दगडू यादव,पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बाजीराव शंकर बंडगर,माळशिरस तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत नाईकनवरे, सांगोला तालुका अध्यक्षपदी पांडुरंग यादव, सोलापूर आणि पंढरपूर संपर्क प्रमुखपदी बळीराम रणदिवे आदी विविध भागांतील पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले .

   राजाभाऊ खिलारे,सुनील अवघडे,रमेश कांबळे, किशोर जाधव,फुलाबाई रणदिवे,छाया पवार, प्रमोद खंदारे,संपत अवघडे,श्रीमंत मस्के,धनाजी शिवपालक,अमोल खिलारे,मसुदेव काळे,भारत फाळके, चंद्रकांत सरडे,बाळासाहेब पाटील,संतोष रणदिवे यांच्यासह दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक लढणारच - संस्थापक प्रा.मच्छिंन्द्र सकटे Pandharpur Mangalvedha by-election will contest  - Founder Prof.Machhindra Sakte 
 
Top