मुंबई, ०५/०२/२०२१ - राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य पर्यटन विभागामार्फत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत कोकण,पुणे, नाशिक,औरंगाबाद,अमरावती आणि नागपूर या ६ विभागांमध्ये २० पर्यटन महोत्सवांचं आयोजन केलं जाणार आहे. 

    कोकणामधे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला महोत्सव, रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन महोत्सव, रत्नागिरी जिल्ह्यात कातळशिल्प महोत्सव, वेळास-आंजर्ले  या महोत्सवांमध्ये नाशिक जिल्ह्यात ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सव, नांदूर मधमेश्वर महोत्सव, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा भागात काजवे महोत्सव तसंच धुळे जिल्ह्यात लळींग किल्ला महोत्सव, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर द्राक्ष महोत्सव,सातारा जिल्ह्यात वाई महोत्सव तसंच कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा महोत्सवाचा यात समावेश आहे. औरंगाबाद विभागानंही काही लोकप्रिय महोत्सवांचं आयोजन करण्याचं निश्चित केलं आहे. फारशी लोकप्रिय नसलेली ठिकाणं पर्यटन नकाशावर आणण्याचा उद्देश असल्याचं पर्यटन संचालकांनी सांगितलं.

 राज्य पर्यटन विभागामार्फत पर्यटन महोत्सवांचं आयोजन Organizing tourism festivals through state tourism department

 
Top