पंढरपूरातील इसबावी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन  Organizing blood donation camp at Isbawi in Pandharpur

 पंढरपूर - श्री.दत्त शिवजन्मोत्सव सोहळा समिती व माजी नगरसेवक बालाजी मलपे मिञ परिवाराच्यावतीने छञपती शिवाजी महाराज यांची पंढरपूरातील इसबावी मलपे चौक येथे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीच्या औच्यित्याने सामाजिक बांधिलकी जोपासत व राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेला कमी रक्तसाठा व राज्याचे आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी नागरिकांनी रक्तदान करण्यास समोर येण्याचे केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

  यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे होते.

  सखुबाई बजाज रक्तपेढीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये ८१ जणांनी रक्तदान केले. त्याबद्दल व कार्यक्रमास सहकार्य केलेबद्दल येथील जेष्ठ नागरिक व समिती पदाधिकारी सदस्य या सर्वांचे पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक बालाजी मलपे यांनी आभार व्यक्त केले.

   यावेळी माजी नगरसेवक गणेश अधटराव,सागर  यादव, सिकंदर ढवळे सर,मा.उपनगराध्यक्ष विशाल मलपे,माजी नगरसेवक सनी मुजावर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबाजी शिंदे ,सुनील ढोले,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल जगताप, सचिन साबळे, प्रशांत मलपे, बबलू म्हेत्रे,  सतीश पाटील,संदीप पाटील ,प्रसाद सातपुते, सतीश घंटे ,सुभाष शिंदे,महादेव शिंदे,सुखदेव शिंदे,दत्ता शिंदे , सतीश शिंदे , परमेश्वर शिंदे,समाधान मलपे, नितीन मलपे , प्रकाश गुंड,राजेंद्र गुंड सर ,माऊली पवार, अमित मोरे, दिनेश मोरे, विशाल दुसाने, योगेश चव्हाण ,रत्नाकर पिसे , समाज सेवक सचिन शिंदे ,अमोल कोळी, रुपेश आंबूरे,सचिन पाटील , अतुल कोळी,निखिल धनवडे,बालाजी शिंदे, राहुल शिंदे, आकाश वांगडे, सागर पडगळ, सुनील गोळे, अविनाश कोळी, ज्ञानेश्वर गांडूळे ,अमोल आटकळे, निलेश धनवडे  भागवत शिंदे, शिवाजी कंडरे  कांता जाधव सचिन झेंड, चेतन धनवडे ,सोमा लोकरे, पत्रकार सागर आतकरे ,प्रकाश लोखंडे, अनिल लोखंडे, सुशांत चंदनशिवे ,दिलीप जाधव ,गोपाळ लोखंडे, मुन्ना पटेल, वैभव परचंडे, किरण खडाखडे ,घमु शिंदे, सुनील अभंगराव, जितू शिंदे उपस्थित होते. 
 
Top