लोकराजा पतसंस्थेच्यावतीने प्राचार्य बी.पी.रोंगे सरांचा सन्मान
On behalf of Lokraja Patsanstha, Principal BP Ronge Saranch Sanman

पंढरपूर - स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बी.पी.रोंगे सर यांना अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्याकडून उत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल लोकराजा पतसंस्थेच्या चेअरमन तथा जि.प.सदस्या शैलाताई गोडसे यांनी संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला .

   यावेळी पुरस्काराच्या माध्यमातून पुढील कार्यास बळ मिळो,तुमच्या कर्तृत्वाचा विचाराचा गौरव खरा अर्थाने झाला आहे.आपल्या हातून व मार्गदर्शना खाली ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी जनतेचे मुले संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे तयार होवो अशा शुभेच्छा शैलाताई गोडसे यांनी रोंगे सरांना दिल्या.

यावेळी संगीता पवार,लोकराजा पतसंस्थेचे सचिव विनोद कदम नितिन काळे आदी उपस्थित होते.
 
Top