माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न
Nitya Puja of Sri Vitthal-Rukmini is performed on the occasion of Maghwari


     पंढरपूर, दि.२३/०२/२०२१ - माघवारी जया शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठलाची पुजा मंदीर समितीच्या सदस्या अँड.माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली.रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली. 

       यावेळी मंदीर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, मंदीर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.माघवारी जयाशुध्द एकादशी निमित्त मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. 
 
Top