अनंत तरे यांचे दुःखद निधन
Nissam devotee of Ekvira Devi lost - Dr. Neelam Gorhe,Deputy Speaker of Legislative Council

     मुंबई/पुणे,२२/०२/२०२१ - शिवसेना उपनेते विधान परिषदेचे माजी सदस्य व श्री.एकवीरा संस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांचे आज दु:खद व निधन झाले. ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. श्री एकवीरा देवीची निस्सीम भक्ती, विधिमंडळाच्या सभागृहात तसेच सभागृहाच्या बाहेर देखील अनेक प्रश्नांवर आवाज व कोळी बांधवांच्या प्रश्नांवर कार्य ही त्यांची वैशिष्ट्ये होती असे विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कै.तरे यांना श्रद्धांजली वाहताना भावना व्यक्त केल्या.

कै.तरे हे ठाण्याचे माजी महापौर , २००० मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले, २००८ मध्ये त्यांची शिवसेना उपनेते म्हणून निवड शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. कोळी समाजाचे नेते होते, एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते या माध्यमातून त्यांनी मोठे सामाजिक कामे केली. त्यांच्या जाण्याने ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची खंत डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि संपूर्ण शिवसेना त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
 
Top