सोलापूर, ०५/०२/२०२१- पोलीस हवालदार अब्दुल रशीद शेख सोलापूर ग्रामीण यांनी गुन्हे अभिलेख केंद्र नवी दिल्ली यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या सीसीटीएनएस व आयसीजेएस या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेवून वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय पारितोषिक मिळविले आहे त्याबद्दल दिनांक ०४ फेब्रुवारी २०२१ रोजी पोलीस महासंचालक कार्यालय,महाराष्ट्र राज्य मुंबई येथे हेमंत नागराळे, नूतन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे हस्ते राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र ,नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त झालेले राष्ट्रीय पारितोषिक व प्रमाण पत्र सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आले आहे .


      पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख यांनी महाराष्ट्र पोलीस व सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव देशपातळीवर उंचावीले आहे.आज तागायत इकबाल शेख यांनी १० सुवर्ण , ७ रौप्य , ११ कांस्य व १ राष्ट्रीय पारितोषिक व पदकाची कमाई करून यशाचे शिखर गाठले आहेत.त्यांचे या उल्लेखनीय कामगिरीमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव देशपातळीवर उंचावीले आहे . पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे सदर कार्यक्रमामध्ये एस.जगन्नाथन अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई , अतुलचंद्र कुलकर्णी,अप्पर पोलीस महासंचालक , रंजनकुमार शर्मा,संभाजी कदम पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे व इतर वरीष्ठ अधिकारी यांचे उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम पार पडला .

पोलीस हवालदार अब्दुल रशीद शेख यांना राष्ट्रीय पारितोषिक National Award to Police Constable Abdul Rashid Sheikh 
 
Top