'कोल्हापुर-धनबाद विषेश रेल्वे' ह्या नवीन रेल्वेचा पुष्पहार अर्पण शुभारंभ करण्यात आला.
Launch of Kolhapur-Dhanbad Special Railway


पंढरपूर / प्रतिनिधी- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिना पासून कोल्हापूर- धनबाद - कोल्हापूर साप्ताहिक विशेष रेल्वे सुरु करण्यास रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मंजूरी दिली असून त्या अनुषंगाने रेल्वे बोर्डाने सदरील रेल्वेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे .कोल्हापूर येथून दर शुक्रवारी सकाळी ४.३५ वाजता सुटणारी रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता धनबाद येथे पोहचणार आहे . कोल्हापूर , मिरज,पंढरपूर,वाशी,उस्मानाबाद,लातूर,परळी , परभणी,नांदेड ,आदिलाबाद ,नागपूर ,इटारसी , जबलपूर,माणिकपूर ,प्रयागराज ,वाराणशी , बोद्धगया सासाराम मार्गे धनबाद असा या विशेष रेल्वेचा मार्ग असणार आहे.सदरील नव्या रेल्वे सेवेमुळे लातूरकर प्रयागराज,वाराणशी,बौध्दगया , पार्श्वनाथ मंदिर या तीर्थक्षेत्राशी थेट जोडले जाणार आहेत.सदरील रेल्वे लातूर मार्गे सुरु व्हावी यासाठी मागच्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता .या रेल्वेच्या सेवेमुळे सांगली, कोल्हापूर ,सातारा,सोलापूर ,लातूर जिल्ह्यातील भाविकांना दर्शनासाठी जाणे शक्य होणार आहे.


त्यामुळे आज कोल्हापुर-धनबाद विषेश रेल्वेचे पंढरपूरसह अनेक गावांमध्ये रेल्वे आणि कर्मचारी बांधवांचा पुष्पहार अर्पण करुन स्वागत करण्यात आले.ही रेल्वे काशी,बौद्धगया,सम्मेद शिखरजी व अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणारी आहे.विशेषतः जैन समाजाच्या दृष्टीने सम्मेद शिखरजीला जाण्यासाठी महत्त्वाची सोय होणार आहे.


यावेळी यात्रेकरूंचा,रेल्वे स्टाफचा आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा पंढरपूर रेल्वे स्थानकावर सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


देवभूमीमध्ये दीक्षाभूमीचे स्वागत

 कोल्हापूर धनबाद विशेष रेल्वे गाडी ( गाडी क्रमांक 01045 )  ज्यामुळे पंढरपूर-कुर्डुवाडी तसेच आपल्या भागातील श्री सम्मेद शिखरजीला जाणारे यात्रेकरूंना यात्रा सुखकर होणार आहे, या गाडीची आज १९ फेब्रुवारी रोजी प्रथम फेरी होती, पंढरपूरमध्ये या रेल्वेचे स. ८.५० वा.स्थानकात आगमन झाले त्यावेळी स्वागत करण्यात आले . याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत,महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ शाखा पंढरपूर जिल्हा सोलापूर यांचे मार्फत महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघचे जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग बापट, संघटक गणेश वाजगे, पंढरपूर तालुका अध्यक्ष सागर रणदिवे, सचिव विनोद बापट, सहसंघटक शिवकुमार भावलेकर ,जैन सोशल ग्रुप,पंढरपूर या संघटनेचे प्रतिनिधी 


तसेच युवा नेते प्रणव परिचारक,आरपीआय आठवले गटाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि रेल्वे समिती सदस्य जितेंद्र बनसोडे आणि त्यांचे सर्व सहकारी, स्टेशन प्रबंधक चनगौडर, श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर बाहुबली गांधी, मा.अध्यक्ष महावीर शहा,उपाध्यक्ष महावीर दोशी,अमित व्होरा, रोहित चंकेश्वरा,नमन गांधी, प्रज्योत गांधी, विश्वजीत फडे,सचिन शहा,सुभाष गांधी,सचिन दोशी हे उपस्थितीत गाडीला हार बांधून स्वागत करण्यात आले तसेच गाडीचे चालक, गार्ड, स्टेशन प्रबंधक व श्री सम्मेद शिखरजीला जाणारे यात्रेकरू यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश फडे, रेल्वे समिती सदस्य जितेंद्र बनसोडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
 
Top